Ahmednagar : धन्य तो डांबरी रस्ता अन् धन्य तो कॉन्ट्रॅक्टर|Viral Video

Road Work (File)
Road Work (File) Tendernama

अहमदनगर (Ahmednagar) : खेडोपाडी होणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आपण अनेकदा अनुभव घेतला असेल. तर खासगी कंत्राटदार (Contractor) पैसे उकळण्यासाठी कमी पैशांत बांधकाम करण्याचा पराक्रम करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video On Social Media)

Road Work (File)
Nashik : डीपीसीच्या निधीतून तिन्ही खासदारांना वगळले? दादा भुसेंचा मोठा निर्णय

अहमदनगर जिल्ह्यातील एक व्हिडिओ समोर आला असून पारनेर तालुक्यातील एक नव्याने दुरूस्त करण्यात आलेला रस्ता हाताना उखडत असल्याचं समोर आलं आहे. काही स्थानिक नागरिक येथे फावड्याने रस्ता उकलताना दिसत आहेत. तर या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Road Work (File)
Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी 6 महिन्यांची प्रतीक्षा; खर्चातही 725 कोटींची वाढ

दरम्यान, "असे रस्ते बनवणाऱ्या 'डांबरट' कंत्राटदारांच्या चेहऱ्यावर अस्सल 'डांबर' चोळलं पाहिजे!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फक्त डांबर टाकून चोपून घेण्यात आलं आहे असं नागरिक या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. सुरज बोरावके यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सदर कंत्राटदारांवर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com