Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी 6 महिन्यांची प्रतीक्षा; खर्चातही 725 कोटींची वाढ

Coastal Road
Coastal RoadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे ऑक्टोबर 2018 पासून काम सुरू झालेल्या कोस्टल रोडचे सद्यस्थितीत एकूण 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, पिलरची कामे वाढल्यामुळे प्रकल्पाचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा आणखी सहा महिने मुंबईकरांना कोस्टल रोडची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काम रखडल्यामुळे प्रकल्प खर्चात सुमारे ७२५ कोटींची वाढ झाली आहे.

Coastal Road
'टोलच्या झोल'ची श्वेतपत्रिका काढा; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या 34 टक्के इंधनाची तर 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरु आहे. या 10.58 किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात 2 किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत. पहिल्या बोगद्याचे काम 10 जानेवारी 2022 ला पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे काम 30 मे रोजी पूर्ण झाले आहे.  नोव्हेंबरपर्यंत एक लेन सुरू करून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. तसे प्रशासनाकडून जाहीरही करण्यात आले होते. मात्र शिल्लक कामावर परिणाम होणार असल्याने कोस्टल रोडची प्रतीक्षा आणखी काहीकाळ लांबण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

Coastal Road
'Mumbai-Goa Highway'तील भ्रष्टाचाराची न्यायाधीशामार्फत चौकशी करा; कोणी केली मागणी?

कोस्टल रोड बांधण्यासाठी सुरुवातीला १२ हजार कोटींचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च ७२५ कोटींनी वाढला आहे. नवीन कामे वाढल्यास हा खर्च आणखी वाढू शकतो. तर चार सल्लागारांवर दरमहा होणारा अडीच कोटींचा खर्च प्रकल्प सहा महिने रखडल्याने सुमारे १५ कोटींनी वाढणार आहे. स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील अंतर वाढवण्याची मागणी केल्यामुळे 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे. यामध्ये एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूचे 7, 9, 10 व 11 पिलरचे काम ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येणार आहे. या पिलरसाठी लागणाऱ्या गर्डरचे काम अंबाला व वाडा येथे करण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर एकूण 10.58 किमीपैकी साडेनऊ किमी काम पूर्ण होईल. शिल्लक काम मेपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com