Tender Scam
Tender ScamTendernama

Ahilyanagar : 'त्या' ठेकेदाराचा आडमुठेपणा भोवणार; काम रखडले अन् निधीही परत जाणार! कारवाईचे काय?

Published on

अहिल्यानगर (Ahilyanagar) : टाकळीभान येथील वाचनालय इमारतीचे काम ठेकेदाराच्या (Contractor) आडमुठेपणामुळे रेंगाळले आहे. तातडीने इमारतीचे काम सुरू करावे, अशी मागणी टाकळीभान ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाकडे केली आहे.

Tender Scam
CM फडणवीसांनी दिली मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी बातमी! 'अशी' वाढणार Metro connectivity

गेल्या एक वर्षापूर्वी आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून टाकळीभान नूतन वाचनालय इमारतीसाठी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ही इमारत बांधकामाचे ऑनलाइन टेंडर घेतलेला ठेकेदार या कामास विलंब करत आहे. त्यामुळे निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

अशा विकास कामांना विलंब करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब वराळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Tender Scam
पुणे-शिरूर उन्नत मार्गापूर्वी आधी सहापदरीकरण करा नाहीतर...; आमदारांचा इशारा

या निवेदनात म्हटले आहे, आमदार तांबे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या या इमारतीचे काम ठेकेदाराने अंदाजपत्रकाच्या २२ टक्के कमी दराने घेतले असल्याने परवडत नसल्याचे ठेकेदार सांगत आहे. त्यामुळे बांधकामास टाळाटाळ होत आहे. शिवाय निधी मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्याने निधी परत मागे जाण्याची भीती आहे.

त्यामुळे ठेकेदाराला हे काम करण्यास जमत नसेल, तर त्याने दुसऱ्या ठेकेदारास हे काम देऊन इमारत पूर्ण करावी, तसेच विकास कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे. जागेबाबत अडचण असल्यास ग्रामपंचायत प्रशासन जागा बदलून देण्यास तयार आहे.

Tender Scam
MSRTC : एसटी महामंडळ 790 शिवशाही बसला गुड बाय करणार का?

पुढील आठ दिवसांत सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून बांधकाम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे; अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब वराळे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्होबा खंडागळे आदींच्या सह्या आहेत.

Tendernama
www.tendernama.com