ठाणेकरांची साडेसाती कधी संपणार? दुसरी डेडलाईनही हुकणार

Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नवीन ठाणे स्टेशनची डिसेंबर २०२५ ची दुसरी डेडलाईन सुद्धा हुकणार हे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेने अखत्यारीतील बहुतांश काम पूर्ण केले आहे, मात्र उर्वरीत काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.

Thane Municipal Corporation
Vadhvan Port: 32 किमीच्या महामार्गासाठी तब्बल अडीच हजार कोटींचे टेंडर

महापालिकेच्या पत्रव्यवहारांनाही रेल्वेकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नव्या स्टेशनअभावी ठाणे आणि मुलुंडच्या लाखो नागरिकांची साडेसाती लवकर संपण्याची शक्यता नाही. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४३ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन ठाणे स्थानक विकसित करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेले काम जवळपास पूर्ण होत आहे. मात्र रेल्वेच्या अखत्यारीत येत असलेल्या कामाला मात्र अद्याप सुरुवातही झालेली नाही.

महापालिकेने मार्च २०२६ला त्यांच्या अखत्यारीत असलेले काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे स्थानक नेमके कधी सुरू होणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

Thane Municipal Corporation
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे एक पाऊल पुढे! महाराष्ट्रातील पहिला...

ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज सात ते आठ लाख प्रवाशी प्रवास करत असून संध्याकाळी तर लोकल पकडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी पकडावी लागते. त्यामुळे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे काम २०१८ रोजी सुरू करण्यात आले. मात्र न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे या कामाला गती मिळू शकली नाही. सुरवातीला नवीन स्थानकाचे काम डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र आता ही डेडलाईनदेखील हुकली आहे.

नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या येथील प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. कर्जत, कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. नव्या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के, मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

Thane Municipal Corporation
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील भूमिगत रस्त्यांच्या कामाला का लागला 'ब्रेक'?

या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४३ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च आता ३२७ कोटींवर गेला आहे.

स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, डेक आणि पार्किंगची सुविधा अशी कामे महापालिकेने केली आहेत. रेल्वेकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म, रेल्वेची इमारत आणि इतर अत्यावश्यक गोष्टी बांधण्यात येणार आहेत. मात्र या कामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. या विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम आता रेल्वे मंत्रालयामुळे रखडले असल्याचे समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com