PM आवासअंतर्गत चौदाशे घरे बांधण्यासाठी 'या' महापालिकेने काढले टेंडर

PM Awas Yojana
PM Awas YojanaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत १४४१ 'परवडणारी घरे' ही बांधण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. योजनेसाठी बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड महापालिकेस मिळाले आहेत, या भूखंडावर 'पीपीपी' तत्वावर टेंडर मागवून विकासक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यापोटी ठेकेदाराला सुमारे ३७ कोटी रुपये महापालिका देणार आहे.

PM Awas Yojana
Eknath Shinde : जागतिक आर्थिक परिषदेत पाच लाख कोटींचे MOU

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात आर्थिक दुर्बल सुमारे १४४१ लाभार्थी आहेत पैकी १२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना दोन लाख रुपये भरुन सदनिका उपलब्ध होणार आहे. या सदनिका ३० चौ.मी इतक्या चटई क्षेत्रफळाच्या असतील. ठेकेदार १४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह) स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल. यामध्ये विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय महापालिकेने घेतला आहे. योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लाख तर राज्यशासनामार्फत रुपये १ लाख याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे.

PM Awas Yojana
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

योजनेअंतर्गत ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या १४४१ सदनिका विकासकाला बांधून द्याव्या लागणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च ३६.८५ कोटी महापालिकेला डेव्हल्पमेंट चार्ज म्हणून द्यावे लागणार आहेत. भूखंडनिहाय एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के क्षेत्रफळ हे ओपन स्पेसेस रोड्स, आरजी आदी करीता राखून ठेवून उर्वरित ९० टक्के क्षेत्रफळापैकी सुमारे ४८.३० टक्के क्षेत्रफळावर ए.एच.पी. घरे, एम.आय.जी. घरे, व्यावसायिक गाळे, आरक्षित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

PM Awas Yojana
Mumbai : महालक्ष्मी रेसकोर्सच्या सव्वादोनशे एकर जागेवर कोणाचा डोळा? वाद हायकोर्टात

एकूण बांधण्यात येणाऱ्या सदनिकांपैकी ६.३१ टक्के सदनिका (१८८) या प्रकल्पातील बाधिंतासाठी ४१.९९ टक्के सदनिका परवडणाऱ्या घरांसाठी पात्र बाधितांसाठी व सेल कॅम्पोनेन्टमध्ये ५०.५० टक्के सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी व १.२१ टक्के व्यावसायिक गाळे (७८ वाणिज्य गाळे) उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बेतवडे सर्व्हे क्र. ७८ साठी २.५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी व बेतवडे सर्व्हे क्र.१५/१ साठी २.२५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी या प्रमाणे चटई क्षेत्रफळाचा वापर करुन पार्कींगसह १६ व २२ मजल्याच्या आरसीसी पध्दतीच्या बहुमजली इमारती व अंतर्गत पायाभुत सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या घरांची विक्री देखील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार डिमांड सर्व्हे करुन केली जाणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com