Mumbai : महालक्ष्मी रेसकोर्सच्या सव्वादोनशे एकर जागेवर कोणाचा डोळा? वाद हायकोर्टात

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर थीम पार्क उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. इथे थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

Mumbai
Eknath Shinde : जागतिक आर्थिक परिषदेत पाच लाख कोटींचे MOU

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुनावणीनंतर तूर्तास ‘थीम पार्क’बाबत कोणताही निर्णय घेऊ नये, या अंतरिम मागणीवर आम्ही निर्देश देऊ असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला १९१४ मध्ये ९९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला होता. महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील जागेचा करार हा १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला संपुष्टात आला होता. त्यामुळे या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत यातील ३० टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे (बीएमसी) आहे.

Mumbai
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

दरम्यान, महालक्ष्मी रेस कोर्सची जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स ताब्यात घेऊन तिथे हॉटेल, इमारती उभारण्याच्या प्रयत्न होत असल्याचे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडून महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीतील मोक्याच्या जागा विकासाच्या नावाखाली बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेसकोर्सच्या जागेचा ताबा सोडण्यासाठी संबंधित व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशयही देखील ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी अलीकडेच महालक्ष्मीचे रेसकोर्स मुलुंड येथे हलवण्यात आले होते, मात्र आता स्वतः बिल्डरच रेसकोर्सची जागा बळकावण्यासाठी सरसावला आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्र आणि कॉट्रक्टटरसाठी काम करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुंबईकरांच्या हक्काची २२६ एकर मोकळी जागा एक बिल्डर दुसऱ्या बिल्डरला विकणार आहे. त्यामुळे आपल्या मुंबईची होणारी लूट थांबवण्यासाठी सगळ्यांनी विरोधात उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com