800 कोटींच्या 'त्या' टेंडरवरून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांत वादाची ठिणगी

सुमारे ८०० कोटींच्या प्रकल्पाचे काम एकाच कंत्राटदाराला काम देण्याचा घाट घातल्याचा आरोप
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit PawarTendernama
Published on

मुंबई (Mumbai): हिंगोलीतील वसमत येथे स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे हरीद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या टेंडर (Tender) प्रक्रियेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
सांगली जिल्ह्यातील 'त्या' विमानतळास राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल

केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी टक्केवारीसाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुमारे ८०० कोटींच्या या प्रकल्पाचे काम एकाच कंत्राटदाराला काम देण्याचा घाट घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवगिरे यांनी आरोप केला आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे उभारले जात आहे. हळद उत्पादनामुळे मराठवाडा, विदर्भासारख्या ‘सुवर्णक्रांती’ होईल या विचाराने या प्रकल्पास २०२२ मध्ये मान्यता देण्यात आली.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar: 'त्या' 2 कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही!

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांची केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. पाटील यांनी या प्रकल्पाला आतापर्यंत मिळालेल्या ३०० कोटींच्या निधीचे काम ‘हर्ष कन्स्ट्रक्शन’ या एकाच कंपनीला दिल्याचे आढळले आहे. मूळ टेंडरमधील रकमेपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त रकमेने ‘हर्ष कन्स्ट्रक्शन’ला टेंडर दिल्याने नवगिरे यांनी त्याला विरोध करताना पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

नवगिरे यांचे आरोप

- मूळ टेंडरच्या पाच टक्के जास्त रकमेने कंत्राटदरास काम

- कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

- एकाच कंत्राटदारास प्रत्येक वेळी टेंडर

- जवळच्या अधिकाऱ्याकडून टेंडर प्रक्रिया

- टेंडर प्रक्रियेसाठी मंडळच बदलले

- काम अत्यंत संथ गतीने

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
विदर्भासाठी गुड न्यूज! 2353 कोटींच्या नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाची तयारी सुरू

टेंडरचे काम त्या- त्या मंडळामध्ये होणे अपेक्षित असते. परंतु असे न करता हे काम नांदेड मंडाळाव्यतिरिक्त अमरावती विभागाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना टेंडर प्रक्रियेचे अधिकार देऊन मर्जीतील अधिकाऱ्याकडून ही टेंडर प्रक्रिया राबवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.

- नितीन देशमुख ( उद्धव ठाकरे गटाचे आमदार )

टेंडर प्रक्रिया पारदर्शक असून ‘ई प्रणाली’ने टेंडर काढल्या आहेत. माझ्याकडे का ही प्रक्रिया पार पाडली याचे उत्तर हेमंत पाटीलच देऊ शकतील.

- अविनाश धोंडगे (अधीक्षक अभियंता )

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र यामध्ये झालेल्या टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हेमंत पाटील यांची तक्रार मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

- राजू नवगिरे, आमदार, वसमत मतदारसंघ

माझी बदनामी करण्याचे काम हे स्थानिक आमदार करीत आहेत. सर्व नियमानुसार व सरकारच्या आदेशानुसारच मी सर्व प्रक्रिया पार पडली आहे. या आमदारांची तक्रार मी वरिष्ठांकडे नोंदवली आहे.

- हेमंत पाटील, अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे हळद केंद्र

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com