Ajit Pawar: 'त्या' 2 कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही!

अजित पवार
ajit pawarTendernama
Published on

मुंबई (Mumbai): बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार
सांगली जिल्ह्यातील 'त्या' विमानतळास राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल

कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कंकालेश्वर मंदिर, बीड व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय, औंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बाराव्या शतकातील यादवकालीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने 9 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. जलकुंडातील स्थापत्यदृष्ट्या आकर्षक असणाऱ्या या मंदिराच्या संवर्धनाबरोबरच परिसराचे सुशोभीकरण, सरोवरातील गाळ काढणे, पदपथ-दुरुस्ती, मंदिर जोत्यांचे मजबुतीकरण, गळती प्रतिबंधक योजना, बाग-बगीचा विकास अशी कामे करण्यात येणार आहेत. या मंदिराच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

अजित पवार
Exclusive: निधी मिळूनही रुग्णालयांतील यांत्रिकी स्वच्छतेला ब्रेक? रुग्णांचे हाल; प्रशासकीय स्तरावर गोंधळ

सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, शिल्पकला, दुर्मिळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.

औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्याअंतर्गत इमारतीचे संवर्धन, नवीन बांधकाम, अंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रे-शिल्पे-ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश आहे.

कंकालेश्वर मंदिर आणि औंध संग्रहालय. या दोन्ही ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अजित पवार
'सामाजिक न्याय'ला दणका? 1500 कोटींच्या टेंडर प्रकरणी सीव्हीसीचे चौकशीचे आदेश

या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृश्यप्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com