Navi Mumbai : महापालिकेचा ठेकेदारांवर असाही वॉच; तक्रार निवारण पोर्टल सुरु

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेअंतर्गत सुरु असलेले विकासाचे विविध प्रकल्प व नागरी सुविधांची कामे यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने 'एनएमएमसी दक्ष' ॲप सुरु केले आहे. तसेच रस्त्यांबाबतच्या तक्रारी नागरिकांना सुलभतेने नोंदविता याव्यात यासाठी तक्रार निवारण प्रणाली सुद्धा सुरु केली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गासाठी आणखी 2 वर्षे वाट पहावी लागणार; कारण...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते बनवितानाच त्यांचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे याकडे बारकाईने लक्ष दिले जात असून काही कारणांमुळे रस्त्यावर खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती तत्परतेने करण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. तसेच रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी वार्षिक देखभालीचा करार करण्यात आला आहे. जेणेकरून रस्ते खड्डेमुक्त राहतील याची काळजी घेतली जात आहे. याशिवाय रस्त्यांवर खड्डे असल्यास त्यांच्या सुधारणेसाठी खड्ड्याची माहिती महानगरपालिकेपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील चौकाचौकात व्हॉट्स ॲप क्रमांक आणि तक्रार निवारण पोर्टलचा तपशील दर्शविणारे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहे. याव्दारे प्राप्त तक्रारी अभियांत्रिकी विभागाकडील 'दक्ष ॲप' च्या माध्यमातून महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडे त्वरित पाठविल्या जातात व त्यांचे 24 तासाच्या आत निराकरण केले जाते.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai Metro : 'एक्वा लाईन-3'वर आतापर्यंत तब्बल 'इतके' लाख मुंबईकर स्वार

या तक्रार निवारण प्रणालीव्दारे रस्ते तसेच रस्त्यांशेजारील गटारे व पदपथ यांच्याही तक्रारी प्राप्त होत असतात आणि त्यांचेही निराकरण तत्परतेने केले जाते. नागरिक रस्ते, गटारे, पदपथ या विषयीच्या तक्रारीसाठी 8424949888 तसेच विद्युत विषयक तक्रारीसाठी 8421033099 आणि पाणीपुरवठा विषयक तक्रारीसाठी 84199004801 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर संपर्क साधून छायाचित्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय 1800222309 / 2310 या दोन टोल फ्री क्रमांकावरही नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात तसेच महानगरपालिकेच्या nmmc.gov.in या वेबसाईटवरही तक्रार निवारण पोर्टलवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai : तब्बल 400 कोटी खर्चून साकारतंय 'ते' राष्ट्रीय स्मारक; लवकरच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरु असलेले प्रकल्प व नागरी सुविधा कामे यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी विभागाने 'एनएमएमसी दक्ष' ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपव्दारे रस्ते, गटारे, पदपथ यांच्या स्थितीबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींविषयीही कार्यवाही केली जाते. नागरिकांकडून प्राप्त तक्रारी आणि त्या स्थळांची प्रत्यक्ष छायाचित्रे दक्ष ॲपवर अपलोड केली जात असल्यामुळे वार्षिक देखभालीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारांना त्याची माहिती मिळते. या तक्रारींबाबत संबधित विभागाचे अभियंते प्रत्यक्ष जागी जाऊन आढावा घेतात व ॲपव्दारेच काम करण्यास ऑनलाईन मंजुरी देतात. मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदाराचे कामगार ते काम करण्यास जातात व काम पूर्ण करुन पूर्ण झालेल्या कामाची छायाचित्रे दक्ष ॲपवर अपलोड करतात. केलेल्या कामावर अभियांत्रिकी विभागाची तपासणी व मान्यता ॲपव्दारेच दिली जाते. प्राप्त तक्रार आणि त्याचे निराकरण केल्यानंतर संबधित कामाच्या मोजमापावर पावती व स्वीकृती ॲपव्दारेच दिली जाते. नवी मुंबईकरांनी शहराचा सुनियोजित व गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर हा नावलौकिक कायम राखण्यासाठी तक्रार निवारण प्रणालीचा सुयोग्य वापर करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित करण्यात आलेल्या एनएमएमसी दक्ष ॲपमुळे नागरिकांकडून प्राप्त तक्रारींवर तत्पर कार्यवाही करणे शक्य होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com