Navi Mumbai Metro
Navi Mumbai MetroTendernama

Navi Mumbai : 'यामुळे' नवी मुंबई मेट्रो सेवा ठरली राज्यातील एकमेव सरस

Published on

मुंबई (Mumbai) : सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेली नवी मुंबईची मेट्रो रेल्वे राज्यात अग्रेसर ठरली आहे. गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर या मेट्रो सेवेला तीन आयएसओ मानांकने मिळाली आहेत. अशा प्रकारची तीनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.

Navi Mumbai Metro
Mumbai : खारघर-तुर्भे जोड मार्गाच्या कामाला सुरुवात; 2100 कोटींचे बजेट

नवी मुंबई मेट्रो रेल्वेला परिचालनच्या पहिल्याच वर्षी तीनही आयएसओ प्रमाणपत्र मिळाली आहेत. महामेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत ब्रिटिश स्टँडर्स इन्स्टिट्यूशनने हे प्रमाणपत्र सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आयएसओ मानांकनाद्वारे सिडको मेट्रोच्या उत्कृष्ट परिचालनासह नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाचा सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Navi Mumbai Metro
MHADA Mumbai : 'त्या’ वसाहतीच्या पुनर्विकासातून म्हाडा होणार मालामाल

आयएसओ 9001:2025 मानांकन हे नवी मुंबई मेट्रोची उच्च दर्जाची सेवा, प्रवाशांचे समाधान आणि परिचालनाची कार्यक्षमता वाढवणे या निकषावर प्राप्त झाले आहे. आयएसओ 14001:2015 मानांकन हे मेट्रो परिचालनच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करून पर्यावरणावरील परिणाम कमी करणे, संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे या निकषावर प्रदान करण्यात आले आहे. आयएसओ 45001:2018 मानांकन हे कर्मचारी व कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपणे या निकषावर प्रदान करण्यात आले आहे. आयएसओ मानांकनाद्वारे उच्चतम दर्जाची मेट्रो सेवा पुरविण्यासह गुणवत्ता, शाश्वतता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सिडकोच्या कटिबद्धतेवर विश्वास दर्शविण्यात आला आहे. नगरविकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सिडकोचे अग्रणी स्थान याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.

Tendernama
www.tendernama.com