Narendra Modi: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच उतरणार PM मोदींचे विमान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होत आहे. दुपारी २.४० वाजता पंतप्रधान मोदींचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा मुहूर्त ठरला
Navi Mumbai Airport, Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या बुधवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा क्षण सिडको प्राधिकरणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा मुहूर्त ठरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांसाठी काय देणार खुशखबर?

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे सिडकोसह संपूर्ण राज्य सरकार केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या विकासात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होत आहे. दुपारी २.४० वाजता पंतप्रधान मोदींचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. रन-वे आणि टर्मिनल-१ इमारतीची पाहणी केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधतील. सिंघल यांनी सांगितले की, उद्घाटनानंतर विमानतळ परिसर सीआयएसएफच्या ताब्यात जाईल आणि प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक डिसेंबर २०२५ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा मुहूर्त ठरला
Good News! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 'त्या' सेवा आता ऑनलाईन

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उभारणीसाठी तब्बल १९,६४७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकूण चार टर्मिनल्स उभारण्यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. सुमारे ११६० हेक्टर जमिनीवर उभारले जाणारे हे विमानतळ देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ ठरणार आहे.

नवी मुंबई विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळाच्या दुप्पट असणार आहे. एकूण ४ टर्मिनल्स असणाऱ्या या विमानतळाची वार्षिक क्षमता ९ कोटी प्रवासी वाहतूक आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक (कार्गो) इतकी असेल. या ठिकाणी ३५० विमानांची पार्किंग क्षमता उपलब्ध आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी अपेक्षा सिंघल यांनी व्यक्त केली. विशेषतः रायगड, ठाणे, कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा मुहूर्त ठरला
Mumbai: धोकादायक इमारतींमधील लाखो रहिवाशांना CM फडणवीस दिलासा देणार का?

विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. यात ३.७ कि.मी. लांबीच्या दोन समांतर कोड-४ एफ धावपट्ट्या (Runways) तयार करण्यात आल्या आहेत. या धावपट्ट्या वाढीव कार्यक्षमतेसाठी दुहेरी समांतर टॅक्सीवे आणि जलद एक्झिट टॅक्सीवेद्वारे जोडलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दक्षिण रनवे कार्यान्वित होईल.

पहिल्या टप्प्यात २९ कॉन्टॅक्ट एअराफ्ट स्टँड, १३ रिमोट कमर्शियल स्टँड, ७ कार्गो स्टँड आणि ३८ जनरल एव्हिएशन (GA) स्टँड कार्यान्वित होणार आहेत. यात १५ जीए हँगर्स आणि १,५०० कार, २० बसेस, २० ट्रकसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. भविष्यकाळात, अति महत्त्वाची व्यक्ती आणि खाजगी विमान वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे १०० जनरल एव्हिएशन विमान स्टँड असलेले एक पूर्ण विकसित जीए टर्मिनल बांधण्याची योजना आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचा मुहूर्त ठरला
Ajit Pawar: 'त्या' 2 कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्ग, मुख्य शहरी रस्ते, उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि जल वाहतुकीद्वारे जोडले जाणार आहे. जल वाहतुकीने जोडले जाणारे हे देशातील पहिले विमानतळ असणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱ्याशी अखंड कनेक्टिव्हिटीसाठी एक मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केला जात आहे. यात अटल सेतू, उलवे कोस्टल रोड आणि प्रस्तावित ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गामुळे सिग्नल-मुक्त रस्ते कनेक्टिव्हिटी मिळेल. याव्यतिरिक्त, मेट्रो लाईन ८ मुळे २०३१ पर्यंत मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ एकमेकांशी जोडले जातील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com