Mumbai Metro-5 : ठाणे-भिवंडी-कल्याण प्रवास होणार सुसाट! मेट्रो-5 चे काम मिशन मोडवर

Metro-4 : मेट्रो मार्ग 5 हा सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांना जोडण्यात येणार आहे.
Mumbai Metro 5
Mumbai Metro 5 Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रो-5 अंतर्गंत ठाणे-भिवंडी कल्याण प्रकल्पाचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पावर 8,416 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मेट्रोचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान 11.9 किमीचा उन्नत मार्ग आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने सरकत असून या मार्गाचे सुमारे 94% काम पूर्ण झाले आहे. (Mumbai Metro 5 News)

Mumbai Metro 5
Pune : पुणेकरांचा प्रवास लवकरच महागणार? काय आहे कारण?

या मेट्रो मार्गामुळे ठाणे ते भिवंडीदरम्यान कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. एमएमआरडीएने गेल्यावर्षी मेट्रो मार्गांचा विस्तार केला आहे, त्यामुळे नागरिकांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरमध्ये कोणत्याही भागात प्रवास करता येणार आहे

ठाणे-भिवंडी-कल्याण असा हा मेट्रो 5 चा मार्ग आहे. 24.90 किमीचा हा मार्ग असून यात 17 स्थानके असणार आहेत. तसेच, मेट्रो 5 प्रकल्प मुंबई मेट्रोशी जोडला जाणार आहे. त्यामुळे भिवंडीतून मुंबईत येणे एकदम सोप्पे होणार असून, प्रवासही जलद होणार आहे. या प्रकल्पासाठी 8 हजार 416 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Mumbai Metro 5
शक्तिपीठ महामार्गाचे पाऊल पडते पुढे; आवश्यक भूसंपादनासाठी...

मेट्रो मार्ग 5 हा सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांना जोडण्यात येणार आहे. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. तसेच, या मेट्रो मार्गामुळे सध्याच्या प्रवासाची वेळ 50 ते 75 टक्के पर्यंत कमी करेल.

या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडीदरम्यान असून हा 11.9 किमीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावर 6 स्थानके आहेत. मेट्रो मार्ग 5 च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने सरकत असून या मार्गाचे जवळपास 94 % काम झाले आहे.

Mumbai Metro 5
Pune Metro : स्वारगेट - कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा खर्च 683 कोटींनी वाढणार; कारण काय?

मार्गिकेला आवश्यक असणाऱ्या कशेळी डेपोच्या जमिनीचे अंशत: अधिग्रहण झाले असून, उर्वरीत भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे.

या मार्गावर १. बाळकुम नाका, २. कशेळी, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५.अंजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाव, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी ही स्टेशन आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com