Mumbai Metro-3 : 'त्या' टेंडरमुळे प्रवाशी अन् मेट्रो दोन्ही होणार 'तृप्त'!

Tender News : एमएमआरसीएलद्वारे १.३ लाख चौरस फूट व्यावसायिक जागा वितरित
Mumbai Metro
Mumbai Metro Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (मुं.मे.रे.कॉ.) मेट्रो लाईन-३च्या २७ स्थानकांवर सुमारे १.३ लाख चौरस फूट व्यावसायिक जागा यशस्वीरित्या वितरित केल्या आहेत.

या जागा खुल्या टेंडर प्रक्रियेद्वारे खाद्य व पेय (फूड अँड बेव्हरेज), रिटेल, बँक एटीएम आणि व्हेंडिंग मशीन यांसारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. उपलब्ध जागांमध्ये सुमारे ४०,००० चौरस फुटांच्या मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून १०० चौरस फुटांच्या लहान छोट्या दुकानांचा देखील समावेश आहे.

Mumbai Metro
Solapur : सोलापूर जिल्ह्यासाठी गुड न्यूज! उजनीसह 'या' पाच...

या टेंडरमध्ये टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी, नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स, आणि चितळे बंधू यांसारख्या प्रमुख उद्योगसमूहांनी भाग घेतला होता.

या व्यावसायिक जागा मेट्रो-३ स्थानकांच्या महत्त्वाच्या जागी असल्याने व भविष्यात या मार्गावरील वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या टेंडरला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या द्वारे प्राप्त होणाऱ्या महसुलामुळे जायकाचे कर्ज फेड करण्यास व मेट्रो-३ कार्यान्वयनाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. नॉन फेअर रेव्हेन्यू संदर्भातील कामांचे व्यवस्थापन ऑक्टस अॅडव्हायजर्स या सल्लागार कंपनीकडून केले जात आहे.

Mumbai Metro
Pune : महापालिकेकडून रस्त्यांच्या डांबरीकरणाचा सपाटा, मात्र फूटपाथ गेले 'खड्ड्यात'

याविषयी एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, भाडे उत्पन्नाच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून मिळणारी कमाई मेट्रोचे तिकिट दर वाजवी ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल, ज्यामुळे मेट्रो प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल व मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर वाढेल.

पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यास मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि राहणीमानचा दर्जाही उंचावेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com