Mumbai-Goa Highway: 'दर्जेदार कामापेक्षा टक्केवारीचा विचार'! राजकीय हस्तक्षेपावर राज ठाकरेंचा हल्लाबोल

कंत्राटदारांनी काम सोडण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा; ‘तिसरी मुंबई’, स्थानिक रोजगार आणि कोकणातील जमीनविक्रीवरही उपस्थित केले प्रश्न
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai): राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांकडून मागितली जाणारी ‘टक्केवारी’ यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रेंगाळल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. दर्जेदार कामापेक्षा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याने कंत्राटदार काम सोडत असल्याचा दावाही त्यांनी केला. या

Mumbai Goa Highway
Ratnagiri Cruise Terminal: कोकणच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा प्रकल्प; भगवती बंदरात उभारणार क्रुझ टर्मिनल

रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी महामार्गाच्या दुरवस्थेसह कोकणातील विकासप्रकल्प, स्थानिकांचा रोजगार, जमीनविक्री आणि प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ या मुद्द्यांवर भाष्य केले.

कंत्राटदारांनी काम का सोडले?

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, कंत्राटदार कंटाळून निघून गेल्यामुळे महामार्गाचे काम थांबल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, ते नेमके कशामुळे कंटाळले, याचा विचार व्हायला हवा. कामाच्या दर्जापेक्षा ‘टक्केवारी’ला महत्त्व दिले जात असल्याने कंत्राटदारांनी माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याबाबत अनेक वर्षांपासून आश्वासने दिली जात आहेत; प्रत्यक्षात मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा सामना करावा लागतो, असे ठाकरे म्हणाले. आगामी सणांच्या काळातही हीच परिस्थिती दिसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Mumbai Goa Highway
Dahisar Transport Hub: 1,481 कोटींच्या दहिसर मल्टिमोडल हबचे काम तात्पुरते स्थगित; रहिवाशांच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

विकासात स्थानिकांचा वाटा कुठे?

कोकणातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना सरसकट विरोध नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी स्थानिकांना त्याचा नेमका लाभ किती मिळतो, असा प्रश्न उपस्थित केला. जमीन, पाणी आणि वीज यांसारखी स्थानिक संसाधने वापरली जात असताना रोजगार व व्यवसायांच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाची पुरेशी माहिती स्थानिकांपर्यंत पोहोचलेली नसल्याचा दावाही त्यांनी केला. नव्या गुंतवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या स्पर्धेसाठी कोकणातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जमीन हे स्थानिकांचे आर्थिक आणि सामाजिक अस्तित्व असल्याचे सांगत ती विकण्यापूर्वी दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा पालकमंत्रीपदाच्या वादाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Mumbai Goa Highway
Mumbai-Goa Highway: माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी खुली करणार; रेल्वे उड्डाणपुलाचे 75 टक्के काम पूर्ण

Key Points

  • Mumbai-Goa Highwayचे काम राजकीय हस्तक्षेप आणि ‘टक्केवारी’मुळे रखडल्याचा राज ठाकरे यांचा आरोप.

  • महामार्गाचे काम १५ वर्षांपासून रेंगाळल्याचा दावा त्यांनी केला.

  • कंत्राटदारांनी काम सोडण्यामागील कारणांची चौकशी व्हावी, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

  • सणासुदीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

  • कोकणातील विकासप्रकल्पांचा स्थानिक नागरिकांना नेमका किती फायदा होतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

  • ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाची पुरेशी माहिती स्थानिक भूमिपुत्रांना नसल्याचा ठाकरे यांचा दावा.

  • नव्या रोजगारांसाठी कोकणातील तरुणांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • जमीन विकण्यापूर्वी तिच्या दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक महत्त्वाचा विचार करण्याचे आवाहन.

  • नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा पालकमंत्रीपदाच्या वादाला प्राधान्य दिले जात असल्याची सत्ताधाऱ्यांवर टीका.

Tendernama
www.tendernama.com