Mumbai: गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे 'त्या' कंपनीचे 550 कोटींचे कंत्राट रद्द करा

Goregaon Mulund Link Road: आमदार मिहिर कोटेचा यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Goregaon Mulund Link Road
Goregaon Mulund Link RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai): गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (Goregaon Mulund Link Road - GMLR) प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेसर्स एस. पी. सिंघला या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलुंड मधील एक्यूआय खराब होत असल्याने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी हे ५५० कोटींचे कंत्राट तातडीने रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Goregaon Mulund Link Road
नाशिक मुंबई लोकल प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार

गेल्या आठवड्यात मुलुंडचा एक्यूआय मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून यासाठी या प्रकल्पातील धूर–धूळ, दूषित हवा आणि निकृष्ट काम यांचाच मोठा वाटा असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

आमदार कोटेचा यांनी या प्रकल्पाचे महापालिका अभियंता, प्रकल्प सल्लागार, संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांसह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अमर नगर साईटपासून नाहूरपर्यंत २ किमी परिसराची पाहणी केली. या दरम्यान जवळपास १०० ठिकाणी विविध नियमांचे उल्लंघन आढळून आले.

Goregaon Mulund Link Road
Nashik: घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गाचे काम सिंहस्थापूर्वी करण्याचे आव्हान; भूसंपदानास विरोध

तसेच, पाहणी दरम्यान प्रकल्प अभियंत्यांनीही महत्त्वाची कबुली दिली की या प्रकल्पाचे कंत्राटदार एस. पी. सिंघला यांना सुमारे ४० पत्रे उल्लंघनांबाबत देण्यात आली असून, महापालिकेकडून एक कोटी रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही आणि दंडात्मक कारवाई करूनही कामाच्या गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे कोटेचा यांनी सांगितले.

निकृष्ट काम, धुळीचा प्रचंड त्रास आणि कंत्राटदाराची बेफिकिरी यामुळे मुलुंडकरांना स्वच्छ हवा मिळत नाही. नागरिकांच्या आरोग्यासमोर गंभीर धोका उभा राहिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या कंपनीचे ५५० कोटींचे कंत्राट तातडीने रद्द करावे,” अशी मागणी कोटेचा यांनी केली.

Goregaon Mulund Link Road
Nashik: 'समृद्धी'वरून एसटीला टोल माफी; नाशिक-बोरिवली; नाशिक-छत्रपती संभाजीनगर बसप्रवासात दीड तासाची बचत

गोरेगाव–मुलुंड लिंक रोडच्या या उन्नत भागात गंभीर सुरक्षा त्रुटी आढळून आल्याचे कोटेचा यांनी अधोरेखित केले. सध्या कंत्राटदाराकडून कोणतीही बॅरिकेड्स, रेलिंग्ज किंवा पुरेसे सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांसाठी गंभीर धोका निर्माण होतो. कोणतीही घटना किंवा अपघात झाला, तर किमान २०–२५ फूट खाली पडण्याची शक्यता आहे, जी जीवघेणी ठरू शकते, असे कोटेचा म्हणाले.

मागील आठवड्यात कोटेचा यांनी एमएमआरडीएचे अभियंते आणि टी-वॉर्डच्या अधिकाऱ्यांसह एलबीएस रोडवरील सुमारे २ किमी भागाची मेट्रो लाईन-४ चे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी त्या कंत्राटदारवरही कारवाईची मागणी केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com