Metro 6
Metro 6Tendernama

MMRDA : मेट्रो-6 मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी 508 कोटींचे टेंडर

मुंबई (Mumbia) : स्वामी समर्थनगर ते विक्रोळी 'मेट्रो ६' मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए - MMRDA) 'सॅम इंडिया बिल्टवेल' या कंत्राटदाराची (Contractor) नियुक्ती नुकतीच केली आहे. कंपनीला ५०८ कोटी रुपयांत या कामाचे टेंडर (Tender) देण्यात आले आहे.

Metro 6
Good News : विरार अलिबाग प्रवास होणार सुपरफास्ट; पहिल्या टप्प्यासाठी 19 हजार कोटींचे टेंडर

मेट्रो ६ मार्गिकेची लांबी १५.३१ किमी असून, त्यावर १३ स्थानके असतील. 'जेव्हीएलआर'वरून पवई येथून ही मेट्रो मार्गिका पुढे जाणार आहे. या मार्गिकेमुळे ओशिवारा ते कांजूरमार्ग हा प्रवास जलद होणार आहे. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरे एकमेकांना जोडली जातील. त्यातून या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत मिळणार असून, त्यांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागणार नाही. पुढील अडीच वर्षांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन 'एमएमआरडीए'ने केले आहे.

Metro 6
Nashik : लोकसहभागातून गाळ काढून गंगापूर धरणाचा साठा 100 कोटी लिटरने वाढवणार

सध्या 'एमएमएमआरडीए'ला मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा देण्यात आली आहे. मात्र, कारशेडसाठी आणखी ७ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. 'एमएमआरडीए'ने या अतिरिक्त जागेची मागणी राज्य सरकारकडे यापूर्वीच केली आहे. मात्र, कंत्राटदाराची नियुक्ती झाली तरी अद्याप ही जागा 'एमएमआरडीए'च्या ताब्यात आलेली नाही. यापूर्वी ९ गाड्या एकावेळी उभ्या राहू शकतील, यादृष्टीने 'एमएमआरडीए'ने कारशेडच्या उभारणीचे नियोजन केले होते.

Metro 6
Sambhajinagar : आधीच समस्यांची साडेसाती; त्यात साडेसात कोटींचा चुराडा! काय आहे विषय?

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या मार्गिकेसाठी अतिरिक्त स्टाबलिंग यार्डची गरज पडणार आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी २०३१ मध्ये एकूण १३ गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतील यादृष्टीने कारशेड उभारणी करावी लागणार आहे. मेट्रो कारशेडसाठी अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने 'एमएमआरडीए'ने या अतिरिक्त जागेची मागणी केली आहे.

'सॅम इंडिया बिल्टवेल' या कंत्राटदाराकडून कांजूरमार्ग येथील जागेवर लवकरच कारशेड उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली जाईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com