Good News : विरार अलिबाग प्रवास होणार सुपरफास्ट; पहिल्या टप्प्यासाठी 19 हजार कोटींचे टेंडर

Virar Alibaug Corridor
Virar Alibaug CorridorTendernama

मुंबई (Mumbai) : बहुचर्चित अलिबाग - विरार कॉरिडॉरच्या (Virar Alibaug Corridor) पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ९६ किमी लांबी मार्गाच्या अकरा पॅकेजच्या उभारणीसाठी १९ हजार ३३४ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Virar Alibaug Corridor
Nashik : लोकसहभागातून गाळ काढून गंगापूर धरणाचा साठा 100 कोटी लिटरने वाढवणार

या प्रकल्पावर तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा मल्टिमॉडेल कॉरिडॉर दोन टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. यात पहिला टप्पा विरारनजीकच्या नवघर ते उरणनजीक चिरनेर आणि दुसरा टप्पा चिरनेर ते अलिबाग असा विकसित करण्यात येणार असून, हा मार्ग समृद्धी महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस-वेला जोडणारा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ९६ किलोमीटरच्या मार्गासाठी १०६२.७ हेक्टर इतकी जमीन लागणार असून सध्या भूसंपादन गतीने सुरू आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील हा मार्ग ठाणे जिल्ह्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणार आहे.

या कॉरिडॉरमुळे विरार ते अलिबाग हे प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होणार आहे. याशिवाय या मार्गालगत मेट्रोचे नियोजन असून त्यासाठी ३२ स्थानके प्रस्तावित आहेत.

Virar Alibaug Corridor
Nashik : सिंहस्थात महापालिका खरेदी करणार 20 कोटींची छोटी वाहने

मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे. ९६ किमी लांबीच्या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे. हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत.

हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून, येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

Virar Alibaug Corridor
Nashik : गौणखनिज विभागाला अंधारात ठेवून चांदवड तालुक्यात 3 महिन्यांपासून बेकायदा उत्खनन

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. 

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनच-४ बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.

Virar Alibaug Corridor
Nashik : रोजगार हमीच्या 60:40चे प्रमाण बिघडण्यास जबाबदार कोण? मंत्री की अधिकारी?

असा आहे प्रकल्प...
एकूण खर्च - ५५,००० कोटी रुपये
भूसंपादनासाठी येणारा खर्च - २२,००० कोटी रुपये
प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च - १९,००० कोटी रुपये
आस्थापनांवरील खर्च - १४,००० कोटी रुपये  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com