महाराष्ट्राच्या सागरी विकासाला गती; Water Metro, Dighi Shipbuilding सह 7 प्रकल्पांना मंजुरी

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मान्यता; मांडवा जेट्टी दुरुस्ती, रेडिओ क्लबला कार्यारंभ आदेश, सतकोंडी जोडरस्त्यासाठी भूसंपादन
Mumbai, Water Metro
Mumbai, Water MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राच्या सागरी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मुंबई Water Metro, रायगडमधील Dighi Greenfield Shipbuilding Cluster, रेडिओ क्लब आणि मांडवा पॅसेंजर जेट्टीसह विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विकासकामांसह मंडळाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकासही मान्यता देण्यात आली.

Mumbai, Water Metro
Karanja Fishing Harbour: दुसऱ्या टप्प्यासाठी 151 कोटींचा प्रस्ताव; 6,600 मच्छीमारांना लाभ

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Water Metro आणि Shipbuildingला चालना

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुंबई Water Metro प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलमार्गाचा अधिकाधिक वापर करून मुंबई आणि MMRमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील दिघी येथे Greenfield Shipbuilding Cluster उभारण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी 20 ऑगस्टपर्यंत टेंडर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जहाजबांधणी क्षेत्रातील गुंतवणूक आणि उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सतकोंडी येथे गोवा शिपयार्ड प्रकल्पासाठी जोडरस्ता उपलब्ध करून देणे आणि आवश्यक भूसंपादन करण्यासही मान्यता देण्यात आली.

Mumbai, Water Metro
Nadhavade MIDC: सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला वेग; 15 कोटींच्या कामांची तयारी

जेट्टी, रेडिओ क्लब आणि Bandstand

मुंबईतील रेडिओ क्लबच्या कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देण्यात आली. संबंधित कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रायगड जिल्ह्यातील मांडवा पॅसेंजर जेट्टीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाला मंजुरी देण्यात आली. प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुंबईतील बांद्रा Bandstandच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामालाही मंजुरी देण्यात आली. नागरिक आणि पर्यटकांसाठी उद्यान, बेंचेस, अ‍ॅम्पिथिएटर आणि आवश्यक सार्वजनिक सुविधा विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Mumbai, Water Metro
Ratnagiri Cruise Terminal: कोकणच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा प्रकल्प; भगवती बंदरात उभारणार क्रुझ टर्मिनल

महसूलवाढीवरही भर

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीच्या जमिनींचा प्रभावी वापर करून स्टॉल उभारणी आणि ते भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. मंडळाच्या महसूलवाढीसाठी उपलब्ध जागांचा नियोजनबद्ध वापर, भाडेतत्त्वावरील सुविधा आणि इतर महसूलवर्धक उपक्रमांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. मंजूर प्रकल्पांची टेंडर व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, वित्त विभागाचे उपसचिव सुनील शिंदे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai, Water Metro
Government Tender Policy: शासकीय टेंडर प्रक्रियेत आमूलाग्र बदल; कंत्राटदारांच्या सर्व कामांची माहिती एकाच ठिकाणी

Key Points

  • मुंबई Water Metro प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेच्या सूचना.

  • रायगडमधील Dighi Greenfield Shipbuilding Clusterला मान्यता.

  • दिघी प्रकल्पासाठी 20 ऑगस्टपर्यंत टेंडर सादर करण्याच्या सूचना.

  • मुंबईतील रेडिओ क्लबच्या कामासाठी कार्यारंभ आदेशाला मान्यता.

  • मांडवा पॅसेंजर जेट्टीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाला मंजुरी.

  • सतकोंडी येथील गोवा शिपयार्ड प्रकल्पासाठी जोडरस्ता व भूसंपादनास मान्यता.

  • बांद्रा Bandstandच्या देखभाल-दुरुस्ती व सार्वजनिक सुविधांच्या विकासाला मंजुरी.

  • महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मान्यता.

  • मंडळाच्या जमिनीवर स्टॉल उभारणी व भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी.

  • प्रलंबित प्रकल्पांची टेंडर व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश.

Tendernama
www.tendernama.com