Mumbai : खारघर कोस्टल रोडचे 1020 कोटींचे टेंडर 'जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स'ला

coastal road
coastal roadTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिडकोने ९.६७८ किमी लांबीच्या खारघर कोस्टल रोड (केसीआर) च्या बांधकामासाठी 'जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स' (जेकेआयएल) ला सर्वात कमी बोली लावणारा ठेकेदार म्हणून जाहीर केले आहे. सुमारे १०२० कोटी रुपयांचे हे टेंडर आहे.

coastal road
Mumbai : अकराशे कोटीत साकारतंय बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक; कधी होणार पूर्ण?

नवी मुंबईतील खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते बेलापूरला जोडणाऱ्या खारघर कोस्टल रोडच्या डिझाईन आणि बांधकामासाठी सिडकोने टेंडर प्रसिद्ध केले होते. हा प्रकल्प पावसाळ्यासह अडीच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प ९.६७९ किलोमीटरचा आहे. त्यापैकी २.९८६ किलोमीटर हा सध्याच्या रस्त्याचा भाग आहे. नवीन रस्त्यामध्ये स्टिल्ट कन्स्ट्रक्शन आणि ग्राउंड लेव्हल रिक्लेमेशन असेल, ज्यामुळे नवी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांदरम्यान चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. हा रस्ता खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते खारघर रेल्वे स्थानकाजवळील प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण योजनेपर्यंत आणि नेरुळमधील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील अंडरपासपर्यंत विस्तारेल. हा मार्ग नवी मुंबई विमानतळाला समांतर धावेल. तर खारघर स्थानकाला बेलापूरशी जोडेल, ज्यामुळे या भागातील प्रवासाची कार्यक्षमता सुधारेल. हा रस्ता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ वॉटर टर्मिनल, खारघर आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल.

coastal road
Mumbai : NHAI बांधणार पागोटे ते चौक नवा महामार्ग; 2900 कोटींचे बजेट

पुणे-मुंबईकडे जाणार्‍या नागरिकांना नवी मुंबई पामबीच आणि कोस्टल रोडने थेट खारघर टोल नाक्यापर्यंत विना अडथळा जाता येणार आहे. खारघर ते सीबीडी सेटर-१५ खाडीकिनारा अंदाजे ६.९६ किलोमीटर अंतराचा कोस्टल रोड आहे. तळोजा-खारघर मधील नागरिकांना सीबीडी, सेटर-११ मार्गे मार्गे नवी मुंबई विमानतळावर विना अडथळा जाता येणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने रस्त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनला मंजुरी दिली, त्यामुळे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर सिडकोने सप्टेंबर २०२४ मध्ये या बांधकामासाठी २.५ वर्षांच्या बांधकाम कालावधीसह टेंडर काढले होते. २३ डिसेंबर २०२४ रोजी तांत्रिक बोली उघडण्यात आल्या, ज्यामध्ये ४ बोलीदार उघड झाले, त्यापैकी अशोका बिल्डकॉनला पुरेसा कामाचा अनुभव दाखवणारे पुरावे सादर न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांच्या आर्थिक बोली २ जानेवारी रोजी उघडण्यात आल्या. यात जे कुमार इन्फ्रा (जेकेआयएल) १०२०.७० कोटी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) १०२७.०० कोटी आणि जे एम म्हात्रे इन्फ्रा १११२.४१ कोटी रुपये किंमतीचे टेंडर भरले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com