Mantralaya
MantralayaTendernama

नाशिक, पुणे, नागपुरात इन्क्युबेशन - फार्मा पार्क उभारण्याची घोषणा

Published on

मुंबई (Mumbai): राज्यातील औषध संशोधन, उत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारण्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली.

Mantralaya
Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज! सर्व प्रमुख शासकीय कार्यालये एकाच छताखाली येणार

मंत्री झिरवाळ दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्यासोबत राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणाबाबतही चर्चा झाली. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक निधीत वाढ करण्यास नड्डा यांनी मान्यता दिली.

Mantralaya
Sunetra Pawar: स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी सरकारने काय घेतला निर्णय?

या दौऱ्यात मंत्री झिरवाळ यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांचीही भेट घेतली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्य सुविधा बळकट करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी व सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले.

Mantralaya
Mumbai: 'या' कामासाठी आता संपूर्ण राज्यात एकाच वेळी टेंडर काढणार

आयुष मंत्रालयांतर्गत राज्यातील आदिवासी भागात ३०० आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानसही मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला. आदिवासी बांधवांकडे असलेले पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान मौखिक स्वरूपात असून, ते शास्त्रोक्त पद्धतीने लिखित स्वरूपात संकलित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे आदिवासी भागातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

Tendernama
www.tendernama.com