मुंबईकरांसाठी गुड न्यूज! अ‍ॅक्वा लाईनमध्ये आता काढा थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट

Metro, Mumbai
Metro, MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबई मेट्रोचे तिकीट आता तुम्ही थेट व्हॉट्सअॅपवरून काढता येणार आहे. मुंबई मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ही गुड न्यूज देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुरळीत आणि वेगवान होणार आहे.

Metro, Mumbai
Mumbai: कोणाला मिळाले माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) आता मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा PeLocal Fintech Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉटसअॅप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात.

या साठी “Hi” हा संदेश +९१ ९८७३०१६८३६ या क्रमांकावर पाठवू शकतात किंवा स्थानकांवर लावलेल्या QR कोडला स्कॅन करून काही क्षणांतच आपले QR तिकीट उपलब्ध होते.

Metro, Mumbai
मुंबईत अंडरग्राउंड प्रवासाठी आता तब्बल 70 किमीचे भुयारी मार्ग

या सेवेद्वारे प्रवासी एका वेळी सहा QR तिकीटे खरेदी करू शकतात. विविध पेमेंट पर्याय उपलब्ध असून, पेपर तिकीटाची आवश्यकता नाही. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देतो. युपीआयद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तर कार्ड पेमेंटसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. 

“प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक स्मार्ट आणि वापरण्यास सुलभसुविधा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वसामान्यवापरात असलेला माध्यम असल्यामुळे तिकीट खरेदीसाठीही तोअत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमाद्वारे एमएमआरसी मुंबईकरांनाअधिक सोयीस्कर, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभवदेण्यास कटिबद्ध आहे,” असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Metro, Mumbai
Pune Ring Road: रिंगरोडचा खर्च कमी होणार; 'त्या' 31 किमीच्या रस्त्यासाठी पुन्हा टेंडर

“एमएमआरसी आणि PeLocal यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमाचा भाग होण्यास आम्हाला आनंद होत आहे. या सेवेमुळेमेट्रो तिकीट घेणे आता अगदी संदेश पाठवण्याइतके सोपे होईल, ज्यामुळे प्रवाशांना जलद, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचाअनुभव मिळेल,” असे मेटाच्या बिझनेस मेसेजिंग (इंडिया) विभागाचे संचालक रवी गर्ग यांनी सांगितले.

 “दिल्ली मेट्रो, बस इंडिया, एमएमएमओसीएल, डीटीसी आणि इतरवाहतूक संस्थांसोबत यशस्वीरीत्या ही सेवा राबवल्यानंतर, आम्हाला आता मुंबई मेट्रो मार्ग-३ मध्येही ही सुविधा आणताना अभिमान वाटतो. सार्वजनिक वाहतुकीला डिजिटल माध्यमातून अधिक सुलभकरण्याच्या आमच्या प्रयत्नांना या उपक्रमाने नवा आयाम मिळालाआहे,” असे PeLocal Fintech Pvt. Ltd. चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकानंद त्रिपाठी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com