Devendra Fadnavis: मतदारांचा कौल डेव्हलपमेंट अन् इन्फ्रास्ट्रक्चरला

‘ट्रिपल इंजिन सरकार’मुळे मुंबईला फायदा होणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
devendra fadnavis
devendra fadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): रस्ते, मेट्रो, पाणी–सांडपाणी, पुनर्विकास आणि वाहतूक व्यवस्था या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यांवर जनतेने स्पष्ट मोहोर उमटवली आहे, असे चित्र राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालातून समोर आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis
Swachh Bharat Mission: अधिकारी काम करेना; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन मिळेना

निकालानंतर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी “विकासाच्या अजेंड्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे” असे सांगत, महायुतीला मिळालेल्या कौलाचे श्रेय थेट नागरिकांना दिले. तर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी “मुंबईला जागतिक दर्जाचे, जगाला हेवा वाटेल असे शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे” असे स्पष्ट केले.

राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याने, विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण–डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण एमएमआरमध्ये विकासकामांना वेग देणारे निर्णय अपेक्षित आहेत. हा कौल केवळ राजकीय नव्हे, तर इन्फ्रास्ट्रक्चर-केंद्रित धोरणांना मिळालेला जनसमर्थनाचा संकेत मानला जात आहे.

devendra fadnavis
Simhastha Mahakumbh: त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांमध्ये साडेसात कोटींची कामे

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबईसह महाराष्ट्रात विकास हाच अजेंडा राहील. पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.” विकास आणि व्यापक हिंदुत्व हे वेगळे करता येणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निकालानंतर मुंबई आणि एमएमआरमधील प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचा रोडमॅप मांडला. पुढील वर्षी मेपर्यंत मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करून शहर खड्डेमुक्त करण्याचे लक्ष्य, सात ठिकाणी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (STP) उभारून प्रदूषण नियंत्रण, तसेच मेट्रो २, मेट्रो ३ आणि इतर मार्गांचे जाळे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

devendra fadnavis
Mumbai: मुंबादेवी वाहनतळ प्रकल्प प्रकरणी बीएमसी अडचणीत! तिजोरीला 55 कोटींचा फटका?

याशिवाय गोरेगाव–मुलुंड लिंक रोड, बोरिवली टनेल, रिंग रोड, बीकेसी–कुर्ला परिसरातील नवे ट्रान्सपोर्ट सिस्टीम, तसेच पॉड टॅक्सीचे प्रायोगिक प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी कमी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे–साकेत–गायमुख–फॉन्ट्रान मार्गामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ताण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य आणि नागरी सुविधा या इन्फ्रास्ट्रक्चरच्या पूरक घटकांवरही भर देण्यात येत आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि रुग्णालयांच्या सुविधा अद्ययावत करणे, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबई या दिशेने काम गतीने सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

devendra fadnavis
Mumbai: Metro-8 साठी सल्लागार म्हणून काम करण्यास 'या' दिग्गज कंपन्यांमध्ये स्पर्धा

“सत्ता किंवा पदे नव्हे, तर मुंबईकरांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत शिंदे यांनी केंद्र–राज्य–महापालिका अशा ‘ट्रिपल इंजिन सरकार’मुळे मुंबईला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, मुंबईची पायाभूत क्षमता जागतिक स्तरावर उभी करण्यासाठी विशेष नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकूणच, महानगरपालिका निवडणुकांचा निकाल हा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर आणि शहरी सुधारणांच्या अजेंड्याला मिळालेला स्पष्ट जनादेश मानला जात असून, त्याच विश्वासाच्या जोरावर मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास करण्याची दिशा सरकारने पुन्हा अधोरेखित केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com