नाशिक-मुंबई रस्त्यावरील कोंडीवरून बाळासाहेब थोरात कोणावर संतापले?

Vidhan Bhavan
Vidhan BhavanTendernama

मुंबई (Mumbai) : नाशिक-मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंगळवीरी विधानसभेत मंत्र्यांना सुनावले.

Vidhan Bhavan
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे 'ते' 20 हजार कोटींचे टेंडर लांबणीवर?

आमदार रईस शेख यांनी नाशिक मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबईमध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता.

Vidhan Bhavan
Nagpur: 'समृद्धी'वरील अपघातांबद्दल मंत्री दादा भुसेंचे मोठे विधान

थोरात पुढे म्हणाले, एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. मला या प्रवासात ॲम्बूलन्स वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्री उत्तरात सांगतात की ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

Vidhan Bhavan
Nashik ZP : पालकमंत्र्यांनी सुचवलेला वैकुंठरथ नियमात बसवायचा कसा?

यावर मंत्री दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे, तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्र्यांना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहेत. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यासंदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना केल्या. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com