Nagpur: 'समृद्धी'वरील अपघातांबद्दल मंत्री दादा भुसेंचे मोठे विधान

Dada Bhuse
Dada BhuseTendernama

नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित प्रदेशांच्या समतोल विकासाचा महामार्ग आहे. हा जगातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असल्याचे मंत्री भुसे म्हणाले. त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या दरम्यान आतापर्यंत झालेल्या अपघातांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Dada Bhuse
शिर्डी विमानळावर अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग; दोन दिवसांत टेंडर

मंत्री भुसे म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा या मागासलेल्या भागाच्या विकासासाठी हा मार्ग करण्यात आला आहे. विकासाचा समतोल राखणारा पूल हा समृद्धीचा मार्ग आहे. त्याच्या पूर्ततेमुळे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांच्या विकासाला दिशा मिळणार आहे. हा आधुनिक रस्ता अपघातांपासून मुक्त व्हावा यासाठी सर्व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

दररोज सुमारे 20 हजार वाहने या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याची सकारात्मक बाजूही जनतेसमोर यायला हवी. महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ अफवांवर थांबू नयेत. रस्त्यांवर दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात. यापुढे अपघात शून्य महामार्गाच्या संकल्पनेवर काम करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

दादा भुसे यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन महामार्गाच्या निर्मितीपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत या रस्त्याचे महत्त्व जाणून घेतले. बैठकीत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, ए. बी. गायकवाड, एस. एस. मुरडे, मुख्य महाव्यवस्थापक भरत बस्तेवाड, मुख्य अभियंता सुरवसे, निशिकांत सुके, सुरेश अभंग, भूषण मालखंडळे, अभियंते व ठेकेदार उपस्थित होते.

Dada Bhuse
दशकांची कोंडी फुटणार; शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी पाडापाडी सुरू

वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन

महामार्गावरील वेगमर्यादा ताशी 120 किमी निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनांना टोल नाक्यांवर थांबवून समुपदेशन केले जाते. मंत्र्यांच्या दौऱ्यात वाहन चालकाचे समुपदेशन करण्यात आले. भुसे यांनी वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले.

प्रवाशांशी संवाद

मंत्री भुसे यांनी प्रवाशांशी संवाद साधत काळजी करू नका, तुमची सुरक्षा आमची जबाबदारी आहे, असे सांगितले. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलले जाईल. त्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अपघात झाल्यास 15 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते. हा कालावधी 10 ते 12 मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंत्री भुसे यांनी कोल्हापुरातील बाजीराव गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com