रेशनकार्ड धारकांसाठी खूशखबर; गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’

ration
rationTendernama

मुंबई (Mumbai) : राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात सत्तांतर झाल्यापासून हा सहावा आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येत आहे. त्यावर सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च होत आहे.

ration
पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा बूस्टर; MMRDAच्या 24 हजार कोटींच्या कर्जास सरकारी हमी

या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 'आनंदाचा शिधा' प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल. राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देण्यात येईल. यासाठी येणाऱ्या 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

ration
Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

यापूर्वी 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त, 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच 2023 गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर खाद्यतेल असे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला 1 संच (आनंदाचा शिधा) 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर 2023 दिवाळी सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहा हे सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच 'आनंदाचा शिधा' वितरीत करण्यात आला आहे. तसेच यंदा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला 'आनंदाचा शिधा' वितरीत करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com