Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

central park, mahalaxmi race course
central park, mahalaxmi race coursetendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

central park, mahalaxmi race course
Pune : पुणे मेट्रोच्या 'या' मार्गाचा बदलणार चेहरामोहरा; तब्बल 6 कोटींचे टेंडर

महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (युके) येथील पार्कच्य धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे. हा भूखंड सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येणार असून, त्यावर जनतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विकसित करण्यात येईल.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडावरील कराराची 1 जून, 2013 ते या भूभागाचा प्रत्यक्षात ताबा घेण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे या कालावधीसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेच्या फरकाची रक्कम महसूल व वन विभागाने निश्चित करुन दिलेल्या दरानुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे वसूल करण्यात येईल.

central park, mahalaxmi race course
नागपुरचा होणार झपाट्याने विकास; 552 कोटींच्या कामांचे झाले भुमिपूजन

तसेच, महालक्ष्मी रेसकोर्स येथील एकूण 211 एकर भूखंडापैकी मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना 91 एकर भूखंड प्रत्यक्षात ताबा देण्याच्या दिनांकापासून ते पुढील 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण हे वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या तरतुदीनुसार करण्यास मान्यता देण्यात आली.

महसूल विभागाच्या 23 जून 2017 च्या सरकारी निर्णयानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील अनुसूची “डब्ल्यू” मधील महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व तत्सम भूभाग या मालमत्तांना अनुषंगिक तरतुदी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com