एकनाथ शिंदेंकडील 'या' खात्यांमध्ये 10 लाख कोटींची पायाभूत सुविधा निर्मितीची कामे

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीची कामे ज्या शासकीय खात्यांमार्फत सुरु आहेत त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वरचष्मा दिसून येतो. खातेवाटपात नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) ही पायाभूत सुविधा निर्मितीची सर्वात मोठी खाती एकनाथ शिंदे यांना स्वतःकडे खेचण्यात यश मिळाले आहे.

Eknath Shinde
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी दिली Good News! 'त्या' 88 हजार कोटींच्या प्रकल्पामुळे...

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. यापैकी बहुतांश कामे नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीसी) राबविण्यात येत आहेत. नगरविकास विभागाअंतर्गत सर्व महापालिका, नगरपालिका, एमएमआरडीए, सिडकोसारखी महामंडळे येतात. गृहनिर्माण विभागाअंतर्गत म्हाडा, एसआरए सारखे उपक्रम आहेत. तसेच एमएसआरडीसीच्या अखत्यारीतही मोठी विकासकामे सुरु आहेत. या सर्व विभागाअंतर्गत सध्या पायाभूत सुविधा निर्मितीची मोठी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. तसेच काही मोठी कामे प्रस्तावित आहेत.

Eknath Shinde
Navi Mumbai : 'यामुळे' नवी मुंबई मेट्रो सेवा ठरली राज्यातील एकमेव सरस

मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी मिळाली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते तयार केले जात आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे सरकारचे नियोजन आहे. यापैकी बहुतांश प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागाअंतर्गत सुरु आहेत.

राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. 
 
मंत्री :
श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण 
श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य 
श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
श्री. गणेश नाईक : वने
श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता. 
श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.
श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. 
श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. 
श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा 
श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार. 
श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन. 
श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा 
श्री.  अशोक उईके : आदिवासी विकास. 
श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य. 
श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 
कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास. 
श्री. शिवेंद्रसिंह  भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी. 
श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज. 
श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य. 
श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग. 
श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय. 
श्री. प्रताप सरनाईक : परिवहन 
श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास. 
श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.
श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे. 
श्री. आकाश फुंडकर : कामगार. 
श्री. बाबासाहेब पाटील : सहकार. 
श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. 
 
राज्यमंत्री :
अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, 
श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 
डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म. 
श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम). 
श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण. 
श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com