अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेल्या 'त्या' 16 रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे प्रशासक लक्ष देणार का?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील कोंडी निर्माण करणाऱ्या त्या सोळा रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खोळंबल्याचे टेंडरनामाच्या तपासात समोर आले आहे. यासंदर्भात काही माजी लोकप्रतिनिधींशी टेंडरनामा प्रतिनिधीने संपर्क केला असता १९ एप्रिल २०१७ रोजी या रस्त्यांचे रुंदीकरणाबाबत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असल्याचा मुद्दा उपस्थित करत काही माजी सर्व साधारण सभेत काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. मात्र अधिकाऱ्यांवर त्याचा काहीही फरक पडला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Sambhajinagar
Nashik : नाशिककरांसाठी चांगली बातमी! सिटीलिंकच्या संपावर अखेर कायमस्वरुपी तोडगा

तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जुन्या शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या सोळा रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला होता. पहिल्या टप्प्यातील शहर विकास आराखड्यातील बायजीपुरा-जिन्सी - राजाबाजार - किराणा चावडी - पानदरीबा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले होते. गंजेशहिदा कब्रस्तान ते जिन्सी व रेंगटीपुरा दरम्यान त्यांनी रस्ता रूंदीकरणासाठी काही मालमत्ता पाडल्या होत्या. रस्त्यातील विद्युत खांब, डीपी, जलवाहिनी, ड्रेनेज लाइन स्थलांतरीत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. ही कामे करण्यास कंत्राटदार देखील निश्चित करण्यात आले होते.‌ मात्र अधिकाऱ्यांनी काम करून घेण्यास चालढकलपणा करीत मोठा हलगर्जीपणा केला.

२०१७ मध्ये तब्बल सहा महिने या मार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी केली. यात विलंब लावल्याने त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले होते.अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली होती. रस्त्यांवर मातीचा खच पडल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांना दम्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत होते. रुंदीकरणाचे काम संपवून रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाहीत. त्यामुळे काही माजी नगरसेवकांनी स्वतः अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभेत काळी फित लावून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर निषेध व्यक्त करण्यात आला होता.

तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महानगरपालिकेची धुरा हाती घेताच ८  डिसेंबर २०१६ रोजी शहर विकास योजनेत असलेल्या जुन्या शहरातील १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाचे नियोजन  केले होते. दरम्यान १२ ते १८ मीटर रुंद होणाऱ्या या रस्त्यांमुळे जुन्या शहराचा चेहरामोहरा बदलेल असे मानले जात जात होते. मात्र  १६ रस्त्यांपैकी पहिल्याच राजाबाजार ते जिन्सी - बायजीपुरा या रस्त्याच्या रुंदीकरणाला अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रहण लागले.

Sambhajinagar
Nashik : भूसंपादनासाठी महापालिकेकडे निधीच नाही; मलनि:स्सारण प्रकल्पच रद्द

याआधी १३ वर्षांपूर्वी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवून सुमारे १४ रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. त्यानंतर ओम प्रकाश बकोरिया यांनी रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात १६ रस्त्यांचा ॲक्शन प्लॅन तयार केला होत.या मोहीमेसाठी २००२ चा शहर विकास आराखडा त्यांनी गृहित धरला होता. या विकास आराखड्यात जुन्या शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यातील १६ रस्त्यांचे रुंदीकरण प्राधान्याने हाती घेण्याची मोहीम त्यांनी सुरू केली होती.

रस्ता रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या मालमत्तांना रोखीने मोबदला देण्याची स्थिती महापालिकेची नव्हती. त्यामुळे त्यामुळे टीडीआर किंवा एफएसआयच्या रुपाने मोबदला घ्या, असे आवाहन बकोरिया यांनी मालमत्ताधारकांना केले होते. १६ रस्त्यांपैकी राजाबाजार ते जिन्सी - बायजीपुरा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बकोरिया यांनी हाती घेतले होते. रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या बहुतांश मालमत्ताधारकांनी टीडीआर, एफएसआय घेऊन आपल्या मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. मात्र काही मालमत्ताधारकानी रोख मोबदल्याची मागणी करत आडकाठी घातली होती. या रस्त्यावर सुमारे १४९ मालमत्ता रुंदीकरणात बाधीत होत असल्याचा अहवाल सहाय्यक संचालक नगररचना विभागाने सादर केला होता.

Sambhajinagar
Nitin Gadkari : नागपूर येणाऱ्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार

या रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक

 - गुलमंडी ते यादगार मंडप ते अंगुरीबाग हरी मस्जिद - १८ मीटर रुंद रस्ता.

- सुराणा कॉम्प्लेक्स ते संस्थान गणपती - १५ मीटर रुंद रस्ता.

- पैठण गेटमार्गे मनपा शॉपिंग सेंटर ते चुनाभट्टी-१२ मीटर रुंद रस्ता.

- काला दरवाजा ते नुरानी मस्जिद मार्गे अग्रसेन भवन मंगल कार्यालय ते औरंगपुरा पोलिस चौकी- १२ मीटर रुंद रस्ता.

- रोहिला गल्ली, रंगारगल्लीमार्गे गुलमंडीपर्यंत - १५ मीटर रुंद रस्ता.

- सिटी चौक पोलिस स्टेशन ते उत्तम मिठाई भांडार, गुलमंडीपर्यंत - १५ मीटर रुंद रस्ता.

- रंगीन गेट ते घासमंडी सराफा रोडपर्यंत -१२ मीटर रुंद रस्ता.

- लेबर कॉलनी ते लोटा कारंजा, कब्रस्तान मार्गे लोटा कारंजा मटन मार्केटपर्यंत - १२ मीटर रुंद रस्ता.

- हर्षनगर ते मोमीनपुरा - १२ मीटर रुंद रस्ता.

- हर्षनगर, लेबर कॉलनी ते भारतीय लॉज, गांधी पुतळा - १२ मीटर रुंद रस्ता.

- शहागंज चमन ते संस्थान गणपती मार्गे जाधवमंडी - १२ मीटर रुंद रस्ता.

- फाजलपुरा, काचीवाडा ते शहाबाजार - १२ मीटर रुंद रस्ता.

- मनपा शाळा, शहाबाजार ते चंपा मस्जिद चौक - १२ मीटर रुंद रस्ता.

- संस्थान गणपतीपासून राजाबाजार चौक, जिन्सी चौक ते अपेक्स हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता - १५ मीटर रुंद रस्ता.

- राजाबाजार एकनाथ तेली यांचे घर मार्गे काली मस्जिद, रेंगटीपुरापर्यंत - ९ मीटर रुंद रस्ता.

- हरी मस्जिदपासून मोंढा ते चंपा मस्जिद रोडपर्यंत - १५ मीटर रुंद रस्ता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com