Sambhajinagar : 'त्या' सर्व (अ)स्मार्ट रस्त्यांचे आकाशच फाटले; ठिगळं कुठे कुठे लावणार?

Road
RoadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरात पहिल्या टप्प्यातील २२ ठिकाणी रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत. यातील काही रस्त्यांवरील पुलांची कामे अद्यापही रखडलेली आहेत.‌ कंत्राटदाराला रस्ते व पूल बांधण्यासाठी  स्मार्ट सिटी प्रशासनाने ३० ऑक्टोबर २०२३ ची मुदत दिली होती. मात्र अद्याप रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आली आहेत. कंत्राटदाराने सदोष कामे केल्याने शहरातील नागरिकांना गुळगुळीत रस्त्यांऐवजी उंच टेमकाडांवरून सफर करावी लागत आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या या नव्या रस्त्यांना जुनाट रस्त्यांचा लुक बघायला मिळत आहे. 

Road
Sambhajinagar : अखेर 'त्या' (अ)स्मार्ट कोट्यवधींच्या रस्त्यांची दुरूस्ती सुरु

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे शहरात ३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निधीअभावी यातील फक्त २२ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याचे आदेश तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी कंत्राटदाराला दिले होते. त्यानुसार मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली ए. जी. कन्स्ट्रक्शनमार्फत ही कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे, मात्र बहुतांश रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. दरम्यान पहिल्याच टप्प्यातील कामे अपूर्ण असताना कंत्राटदाराने दुसऱ्या टप्प्यातील ४४ रस्त्यांपैकी काही रस्ते कामासाठी खोदून ठेवलेले असल्याने त्यावर कासवगतीने कामे सुरू आहेत. परिणामी शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

Road
Sambhajinagar : अखेर कटकटगेट नाल्यावरील भगदाड दुरूस्तीचे काम सुरू

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे देवगिरी बँक जळगाव रोड ते बजरंग चौक सिडको एन- ५, ओंकार गॅस एजन्सी सिडको एन-८ मार्गे वेणूताई चव्हाण स्कूल ते अनिकेत हॉस्पिटल,आविष्कार चौक ते भोला पान सेंटर सिडको, तापडिया पार्क ते पब्लिक स्कूल ते पुंडलिकनगर पोलिस स्टेशन ते महापालिका उद्यान पारिजातनगर, आंबेडकर पुतळा भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड, रिलायन्स पेट्रोलपंप जळगाव रोड ते त्रिदेवता मंदिर मार्गे सिडको एन- ७ पोलिस स्टेशन, डॉ. कल्याण काळे यांचे घर ते लोकसेवा स्टेशनरी ते परिवर्तन गॅरेज, मथुरानगर सिडको एन- ६, छत्रपती शिवाजी कॉलेज ते उच्च न्यायालय पूर्व पश्चिम बाजू मार्गे ॲड. प्रवीण मंडलिक यांचे घर, प्रतानगर स्मशानभूमी ते उड्डाणपूल दोन पुलांसह स्मशानभूमीजवळ आणि देवानगरी अंतर्गत रस्ता, सौभाग्य चौक ते ताठे मंगल कार्यालय ते सिद्धार्थ चौक, जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक गारखेडा, आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर, एकता चौक शहानूरमिया दर्गा ते प्रतापनगर ऑटोरिक्षा स्टॅण्ड पंजाब डेअरी, एमटीडीसी हॉलीडे कॅम्प ते अण्णा भाऊ साठे चौक मार्गे मिलिंदनगर, कबीरनगर, न्यू. भाग्योदयनगर उमरीकर लॉन ते लोटस पार्क सातारा परिसर, जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक गारखेडा,पडेगाव ते पडेगाव स्लॉटर हाऊस, बाटा शूज ते एसबी कॉलेज गेट आणि गोली वडापाव ते एसबी कॉलेज गेट, जिंतूरकर हॉस्पिटल ते अदालत रोड आणि भाग्यनगरातील अंतर्गत रस्ता,माऊली मेडिकल स्टोअर ते भावसिंगपुरा सांची कमान, एसबीओ स्कूल ते अंबिकानगर, तुळजाभवानी चौक ते भगतसिंगनगर,दर्गा हजरत पीर साहेब पुतळा ते रेंगटीपुरा मार्गे चंपा चौक, गणपती मंदिर नागेश्वरवाडी ते एमजेपी कार्यालय आणि खनाळे हॉस्पिटल ते झांसी राणी चौक आदी रस्ते गुळगुळीत केल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. 

Road
Mumbai : महालक्ष्मी रेसकोर्सच्या सव्वादोनशे एकर जागेवर कोणाचा डोळा? वाद हायकोर्टात

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून होत असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभार्यांनी देवगिरी बँक जळगाव रोड ते बजरंग चौक सिडको एन- ५, ओंकार गॅस एजन्सी, जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक,. माजी आमदार डाॅ.कल्याण काळे यांचे घर ते लोकसेवा स्टेशनरी ते परिवर्तन गॅरेज, मथुरानगर सिडको एन- ६ या रस्त्यांची दुरूस्ती करायला सुरूवात केली. जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक या रस्त्याची दुरूस्ती करून देखील पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे. बाकी इतर रस्त्यांची अद्याप दुरूस्ती झालेली नाही.एकुणच सर्वच नव्या कोर्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून आकाशच फाटल्याने ठिगळं कुठे कुठे लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com