Sambhajinagar : अखेर कटकटगेट नाल्यावरील भगदाड दुरूस्तीचे काम सुरू

घोषणा ३ कोटीची; टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर १ कोटीचे काढले टेंडर
Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील बहुचर्चित कटकटगेटच्या भगदाडाच्या दुरूस्तीचे काम अखेर महापालिकेने हाती घेतले असून, यासाठी १ कोटीचे  टेंडर काढण्यात आले होते. यात १८ टक्के कमी दराने टेंडर मध्ये सहभाग नोंदवल्याने आजीम खान यांच्या मारूफ कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले असून बारा महिन्याच्या मुदतीत हे काम मार्गी लागणार आहे. यासंदर्भात "टेंडरनामा"ने वृत्तमालिका प्रसिद्ध करताच खा. इम्तियाज जलील यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडे तगादा लावत हे काम करण्यास भाग पाडले. आता कटकटगेट समोरील भगदाडाची लिपापोती करून दोन्ही बाजूंना संरक्षित भिंत, संरक्षित जाळ्या आणि भव्यदिव्य सुशोभिकरण केले जाणार असून, नागरिकांना बसून सौंदर्य न्याहाळण्यासाठी खास सिमेंट बाकड्यांची देखील सोय केली जाणार असल्याचे कंत्राटदार अजीम खान यांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : कटकट गेटसाठी 50 लाखांची उधळपट्टी करून साध्य काय झाले?

आधी आठ वर्षांपूर्वी ऐतिहासिक कटकट गेटच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे व पुलाचे काम केले. मात्र रस्ते तयार करताना आणि पुलाची उंची वाढविताना या ऐतिहासिक दरवाजाची दखल घेतली नाही. परिणामी पुलाची आणि सिमेंट रस्त्याची उंची वाढवल्याने शहरातील मकई गेट प्रमाणेच हा ऐतिहासिक ठेवा देखील खड्ड्यात घातला गेला. विशेष म्हणजे गेटच्या समोरच नाल्यावरील स्लॅब कोसळून भले मोठे भगदाड पडल्याने येथे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता वर्तवत "टेंडरनामा"ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. सोबतच दीड वर्षांपूर्वी गेटच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या माध्यमातून अर्धा कोटींचा कशा पद्धतीने चूना लावला गेला. याचाही भांडाफोड "टेंडरनामा"ने केला. मात्र या प्रकरणी चौकशीला बगल देत महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित नगर विकास विभागाने दिलेल्या निधीतून तीन कोटी रुपये खर्च करून कटकट गेटचे सुशोभीकरण करणार, अशी घोषणा केली होती. मात्र त्यांना याही घोषणेचा विसर पडला होता.

Sambhajinagar
Sambhajinagar : दमडी महल ते चंपा चौक रुंदीकरणाच्या नुस्त्याच बाता; 700 मालमत्ताचे मार्किंग, पण कारवाई कधी?

आधी चुकीच्या कामामुळे दरवाज्याचे अस्तित्व धोक्यात आणले. आता गेटसमोरील भगदाड मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे "टेंडरनामा"ने सचित्र उघड करताच खा. इम्तियाज जलील यांनी वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासकांना जागे केले. त्यामुळे गेटचे सुशोभीकरण व नाल्यावरील भगदाड बुजविण्यासाठी एक कोटीचे टेंडर तातडीने काढण्यात आले. त्यात १८ टक्के कमी दराने टेंडर भरणाऱ्या अजीम खान यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. यात महापालिकेचे १२ लाख रुपये वाचल्याने ८८ लाखात धोकादायक भगदाडाची कटकट मिटणार असून सुशोभिकरण देखील केले जाणार असल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com