छोट्या कामासाठी वर्कऑर्डरची प्रतिक्षा; 10 लाखांच्या कामाला...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अमरप्रीत ते सौजन्यनगर दरम्यान रस्त्याच्या कडेला एक ड्रेनेज फुटलेलं आहे. रोज त्यातील घाण पाणी रस्त्यावर येऊन रस्ता तर घाण झालाच आहे, पण खूप दुर्गंधी सुटली आहे. हे ड्रेनेज एक महिना झाला तसेच आहे. ना प्रभाग अभियंता त्याकडे लक्ष देते ना कोणी. रोज रस्त्यावर पाणी साठलेल असतं. लोक त्यातूनच वाट काढून कसे तरी जात असतात. त्या पाण्यामुळे प्रवाशांना उलट्या अन् मळमळीचा त्रास वाढला आहे. तिथे बाजूलाच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि पुतळा आहे. त्या घाण पाण्यामुळे प्रवासी त्रस्त झालेले आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'भूमिगत'च्या कामात घोळ; निकृष्ट कामाचा पुरावा

या संदर्भात महापालिकेतील संबंधित कारभाऱ्यांना विचारले असता जालनारोडलगत राज हाॅटेलपासून ते माजी आमदार सुभाष झांबड यांच्या जमिनीसमोरून ते रमानगरपर्यंत जाणारी ड्रेनेजलाइन नादुरूस्त झाल्याने ही समंस्या निर्माण झाली आहे. तीनशे एमएमची ही मलनिःसारण वाहिनी बदलण्यासाठी प्रशासकांनी मान्यता दिली आहे. नुकतेच टेंडर प्रसिध्द झाले होते. त्यात फारूकी कंन्सट्रक्शनला हे काम देण्यात आले आहे. याकामासाठी चार लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली नसल्याने त्याने काम सुरू केले नसल्याचे सांगण्यात आले.

Sambhajinagar
Sambhajinagar : पालकमंत्री भुमरेंच्या घरासमोर शिंदे सरकार पावले

इकडे जशी तत्परता दाखवली मग तिकडे का नाही

सिडको एन-१ मध्ये चेंबर आणि पाइप जाम झाल्यावर या भागातील नागरिकांनी महापालिका प्रभाग अभियंत्यांकडे तक्रार केली. यानंतर  अभियंत्याने तातडीने दहा लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. धक्कादायक म्हणजे आयुक्तांची याकामाला अद्याप मंजुरी नाही, कामाचे टेंडर प्रसिध्द केले नाही. विनाटेंडर विनावर्कऑर्डर काम सुरू करण्यात आले. इकडे जशी तत्परता दाखविण्यात आली. तशी तत्परता इकडे का दाखवण्यात येत नाही. महापालिकेत दहा लाखाची मोठी कामे विना वर्क ऑर्डर सुरू होतात. आणि चार लाखाच्या छोट्या कामांना वर्क ऑर्डरची प्रतिक्षा  दाखवली जाते. त्यामुळे अधिकारी कुणाच्या दबाबात काम करतात. की मोठ्या कामात अधीक टक्केवारी मिळते म्हणून अशा कामांत लक्ष घालत तत्परता दाखवतात असा संशय बळावत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com