Sambhajinagar : 'भूमिगत'च्या कामात घोळ; निकृष्ट कामाचा पुरावा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मीडियम टाउन्स (यूआयडीएसएसएमटी) करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पुरावा एपीआय कॉर्नर ते प्रोझोन मार्गावर नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. दहा वर्षापूर्वी शहरातील विकसित भागात भुमिगत गटार योजना प्रकल्पाचा साडेचारशे कोटींचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार जुन्या व नवीन शहरात मॅनहोल बांधुन त्यात पाइप जोडण्यात आले होते. असे असताना त्याच काळात सिडको एन-१ येथील सिव्हरेज टॅक ते झाल्टा एसटीपी प्लॅटची मलनिःसारण वाहिनी का बदलण्यात आली नाही, मॅनहोल का बांधण्यात आले नाहीत, असा प्रश्न सिडकोवासीयांना पडला आहे.

Sambhajinagar
'ST'च्या ई-बसेससाठी 175 डेपोत चार्जिंग स्टेशन्स

जुनाट चेंबर आणि पाइप जाम झाल्यावर सिडको एन-१ भागात दुर्गंधीचा अनेक वर्ष त्रास होत होता. गेली कित्येक वर्ष दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्यावर नागरिकांनी महापालिका प्रभाग अभियंत्यांकडे तक्रार केली. यानंतर भुमिगत गटार योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याचे बिंग फुटले. नागरिकांनी तगादा लावल्यावर प्रभाग अभियंत्याने सिडकोच्या काळातील जुनी लाइन आणि मॅनहोल बांधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी थेट दहा लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. धक्कादायक म्हणजे आयुक्तांची याकामाला अद्याप मंजुरी नाही, कामाचे टेंडर प्रसिद्ध केले नाही. विनाटेंडर विनावर्कऑर्डर काम सुरू करण्यात आले. सदर काम मुस्तफा सिद्दीकी यांना देण्यात आले असून कामातही खाबुगिरी सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांनी याकामाची मी स्वतः चौकशी करणार असल्याचे टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar: शेकडो सामाजिक सभागृहांचे वाटोळे; कोट्यावधीचा चुराडा

शहरात केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मीडियम टाउन्स (यूआयडीएसएसएमटी)या योजने अंतर्गत विकसित भागात भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले होते. दरम्यान या कामात सिडको एन-१ येथील एसटीपी पंप ते झाल्टा एसटीपी प्लॅटकडे जाणारी जुनाट मलनि:सारण वाहिनी बदलण्यात आली नाही, यावरून ३६५ कोटीच्या भुमिगत गटार योजनेच्ता याकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे.

भुमिगत गटार योजनेचे काम आटोपल्यावर तब्बल  दहा वर्षानंतर हे काम करण्यात येत आहे. दरम्यान या कामात सहा कोटीच्या नव्या रस्त्याचे आणि फुटपाथचे पार वाटोळे करण्यात आले आहे. रस्त्यालगत मुरूमाचा डोंगर उभा करत अपघातासाठी ब्लॅकस्पाॅट तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर काम सुरू असल्याच्या ठिकाणी वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा देणारे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. अभियंत्यांची उदासिनता आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे टेंडरनामा प्रतिनिधीने सचित्र विचारणा केली असता त्या अनुषंगाने याकामात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्टपणे दिसताच त्यांनी रस्ते व ड्रेनेज विभागाकडून कामाचे अंदाजपत्रक व इतर माहीती मागवतो व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

Sambhajinagar
Nagpur : चौक होणार स्मार्ट; लवकरच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुरु

या कामाच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतिनिधीने गुरूवारी दुपारच्या सुमारास स्पाॅटवर जाऊन पाहणी केली. येथे १४ फुटाचे तिसऱ्या मॅनहोलचे बांधकाम सुरू असल्याचे दिसले. काम मोठे असल्याचा गाजावाजा करण्यात येत असला तरी कामावर मजुर कमी असल्याने कासवगतीने काम सुरू असल्याचे दिसले. बांधकामात रेती आणि सिमेंट ऐवजी स्वस्तात मिळणाऱ्या डस्टचा वापर करण्यात येत आहे. याकामात दहा ते बारा साडेचारशे डाय मीटरच्या पाइपांचा समावेश असून त्यातही फुटके पाइपाचे तुकडे वापरण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रतिनिधीने महापालिकेतील रस्ते व ड्रेनेज विभागातील कार्यकारी अभियंता व प्रभाग अभियंत्यांना दहा वेळा दुरध्वनीवर संपर्क केला, प्रत्यक्षात कार्यालय देखील गाठले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. संदेश  पाठवून देखील त्यांनी अद्याप अभिप्राय कळवला नाही. त्यामुळे अभियंते भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sambhajinagar
Nashik : गटविकास अधिकाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 5 हजार मजूर अडचणीत

अशी आहे सिडको वर्तुळात चर्चा

केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी योजने अंतर्गत शहरासाठी ३६७ कोटी १६ लाख रुपयांची भूमिगत गटार योजना मंजूर केली होती; या योजनेअंतर्गत ३७२ कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचा गाजावाजा महापालिकेने केला होता. दरम्यान नव्या व जुन्या शहरात मुख्य मलजल नि:सारण वाहिन्या, तीन ठिकाणी एसटीपी उभारण्यात आले. ईतक्या मोठ्या कामात सिडको एन-१ अंतर्गत असलेल्या एसटीपी पंप ते झाल्टा एसटीपी प्लॅटला मिळणारी मोठी मलनिःसारण वाहिनी का टाळण्यात आली. कंत्राटदाराने या सिडकोच्या काळात टाकलेल्या जुन्या वाहिनीवरच नव्या वाहिनीचे बिल  मिळवले असल्याच्या चर्चेचे गुर्हाळ सिडको वर्तूळात सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com