SC: धक्कादायक; 'या' चौकातील 67 KM भूमीगत ड्रेनेजलाइन गेली चोरीला

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) : भूमीगत गटार योजनेच्या कामातील अनेक त्रुटींमुळे ही योजनाच कोट्यवधीच्या घोटाळ्यात अडकली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध एनजीटीत आधीच एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ही योजनाच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. चक्क योजनेत ६७  किलोमीटरची ड्रेनेजलाईन चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार 'टेंडरनामा'च्या तपासात   उघडकीस आला आहे.

या योजनेचा प्रगती अहवालच 'टेंडरनामा'च्या हाती लागला आहे. त्यात तसा उल्लेख देखील करण्यात आहे. नेमक्या याच शोधमोहिमेवर असताना आता थेट विश्वभारती काॅलनीतील चेतक घोडा चौकातील भूमीगत ड्रेनेजलाइन चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याची गत तीन महिन्यापासून शोधाशोध चालू आहे. मात्र ती कुठेही सापडत नाही. यावरून येथे टाकलेल्या ड्रेनेजलाइनच्या खर्चाचे काय झाले, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

Sambhajinagar
Pune : वर्षाच्या सुरवातीलाच बांधकाम सेक्टरसाठी गुड न्यूज!

केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडीयम टाउन्स (यूआयडीएसएसएमटी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी केंद्र सरकारने एकूण खर्चाच्या ६० टक्के रक्कम देण्याचे मान्य केले होते. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून २१९ कोटी ४१ लाख रुपये महापालिकेला मिळाले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४६ कोटी २७ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यांत ७३ कोटी १३ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.

राज्य सरकार व महापालिकेने या योजनेसाठी एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम स्वतःचा हिस्सा म्हणून टाकणे गरजेचे अशी अट लादण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने आतापर्यंत ५४ कोटी ८५ लाख रुपये महापालिकेला दिले आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी ३६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्या कार्यकाळात केलेल्या टेंडर प्रक्रियेनंतर या योजनेची किंमत ४६४ कोटी रुपये झाली आणि योजनेत ९८ कोटी ३१ लाख रुपयांचा फरक निर्माण झाला होता. या फरकासह भूमिगत गटार योजनेचे काम करण्यास महापालिकेने खिल्लारी कंन्सट्रक्शन या कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरुवात केली होती.

Sambhajinagar
MHADA: लॉटरी लागलेल्या गिरणी कामगारांसाठी गुड न्यूज! ५० कोटींतून..

भूमीगत गटार योजनेच्या संदर्भात महापालिकेने तयार केलेला प्रगती अहवालच टेंडरनामाच्या हाती लागला आहे. या प्रगती अहवालाचा अभ्यास केला असता त्यात चक्क ६७ किलोमीटर ड्रेनेजलाईन गायब असल्याचा धडधडीत उल्लेख केला आहे. जो अहवाल महापालिकेने १३ जुलै २०१७ रोजी राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सादर केला आहे. या अहवालाच्या पान क्रमांक तीनवर प्रकल्पात समाविष्ट असलेल्या प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला होता. शहरातील एकूण ५४४ किलोमीटर लांबीच्या विविध व्यासांच्या मलनिःसारण वाहिन्यांपैकी आवश्यकतेनुसार २७२ किलोमीटर पर्यंतच्या विविध व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या बदलण्यात येणार आहेत, असे त्यात म्हटले आहे.

याच प्रगती अहवालाच्या १६ क्रमांकाच्या पानावर, ‘२०५ किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्यांपैकी आतापर्यंत १०३.३५ किलोमीटर मलनिःसारण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत,’ असे नमूद केले आहे. धक्कादायक म्हणजे  एकूण कामाच्या ५५.९७ टक्के काम पूर्ण झाल्याचा उल्लेख देखील प्रगती अहवालात करण्यात आला आहे.

प्रगती अहवालाच्या पान क्रमांक तीनवर २७२ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेजलाईन बदलण्याचा उल्लेख असताना याच अहवालाच्या पान क्रमांक १६ वर २०५ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइनपैकी १०३.३५ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे ६७ किलोमीटर ड्रेनेज लाइनचा फरक निर्माण झाल्याचे लक्षात येते. ही ६७ किलोमीटरची ड्रेनेजलाईन कुठे गेली, त्यावर करण्यात आलेला खर्च नेमका कुणाच्या खिशात गेला आहे, असे प्रश्न निर्माण झालेआहेत.

भूमीगत गटार योजनेवर  झालेला खर्च
काम.................................मंजूर खर्च.......झालेला खर्च
कलेक्शन सिस्टीम................२७७.२१...........११९.९७
एसटीपी बांधकाम................१५५.६९...........९९.२९
५ सेवरेज पंपिंग स्टेशन्स........२४.८५.............८.२३

गोलवाडी ते नक्षत्रवाडी काम..६.२५...............५.५६
एकूण................................४६४.००...........२३२.८०
(खर्च कोटी रुपयांत)

Sambhajinagar
Nashik: मोफत अंत्यसंस्कार योजना; कोण खातेय मृताच्या टाळूवरील लोणी?

आता चेतकघोडा चौकातील ड्रेनेजलाइन चोरीला

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत टिळकनगर ते जवाहरनगर पोलीस स्टेशन येथील सहा कोटी २८ लाख रूपये खर्चून व्हाइट टाॅपिंग रस्त्याचे काम गत सहा महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान चेतक घोडा चौकात  ड्रेनेजलाईन फुटली आहे. उघड्यावर सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदाराला येथील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजनेतील ड्रेनेजलाईनचे दुसरे  चेंबर सापडत नाही हे, मुख्य चौकातच एक चेंबर सारखे चोकअप होत आहे. घाण सांडपाणी थेट चौकात उघड्यावर साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. 

बाजूलाच उच्चभ्रू नागरी वसाहत व व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. शिवाय शुद्ध हवा मिळावी म्हणून दररोज सकाळ-संध्याकाळ महिला-पुरुष मोठ्या संख्येने या मार्गाने आसपासच्या उद्यानात व विभागीय क्रीडासंकुलाकडे फिरायला जातात. मात्र ड्रेनेजच्या पाण्यामुळे त्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, उग्र वासामुळे नाक दाबून ये-जा करावी लागत आहे.

Sambhajinagar
Nagpur: वर्षभरापासून का रखडले सोलर सिस्टीम बसविण्याचे काम?

अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही

ठेकेदाराने चौकात दक्षिण - उत्तर दिशेला स्ट्राॅम वाॅटर योजनासाठी एका बाजूने अडीच मीटरचे ६०० डाय मीटरचे २० मीटर अंतरात ७ आरसीसी पाइप भूमिगत केले. दुसऱ्या बाजुने अशाच प्रकारचे आठ भूमीगत पाइप २२.५ मीटर अंतरात टाकले. पण स्मार्ट सिटी प्रशासनातील नवखे अधिकारी आणि महापालिकेच्या असमन्वयामुळे हे पाइप जोडायचे कुठे, यासाठी त्याला ड्रेनेजलाइन सापडत नाही.

महापालिकेने देखील काल सुनील पाटील नामक ठेकेदार ड्रेनेजलाईनची शोधाशोध करायला पाठवले होते. त्यानेही खूप प्रयत्न केले, पण ड्रेनेजलाईन सापडली नाही. परिणामी चौकातील काम रखडलेले आहे. प्रशासनाने फुटलेल्या ड्रेनेजलाईनची तात्काळ दुरुस्ती करुन दुर्गंधीतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमूधन केली जात आहे. मात्र येथील ड्रेनेजलाईनच चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी ड्रेनेजलाईन सापडत नसल्याने चौकात पॅव्हरब्लाॅक टाकायचे की, काॅंक्रिटीकरण करायचे याचे देखील ठेकेदाराला निश्चित सांगता येत नाही.

येथे पूर्वी डांबरीकरणाच्या दोन ते तीन लेअर टाकल्याने ड्रेनेजलाईन दबली गेली असावी, असा अंदाज महाफालिकेचे अधिकारी लावत असल्याने आता नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्याचा सल्ला देत जनतेच्या पैशाचे वाटोळे केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com