दुष्काळात शिंदे सरकारचा आश्वासनांचा पाऊस; 7 वर्षांपुर्वीच्या फडणवीस सरकारच्या घोषणा कागदावरच

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मागील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने तब्बल ४९ हजार २४८ कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी देत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाचा संकल्प करण्यात आला होता. आज या बैठकीला सात वर्षे पूर्ण होत असून, १६ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पुन्हा एकादा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केला.

धक्कादायक बाब म्हणजे सात वर्षांपुर्वी जाहीर केलेला निधी आणि आत्ताचा निधी यात मोठी तफावत आहे. त्यामुळे सात वर्षांनंतर मराठवाड्यात झालेले विस्तारीकरण यासाठी हा निधी पुरेसा ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सात वर्षांपुर्वी मंजूर केलेल्या प्रकल्पांपैकी बोटावर मोजण्याइतके प्रकल्प सोडले तर इतर प्रकल्प अद्यापही कागदावरच आहेत. त्यामुळे शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पांसाठी जाहीर केलेला निधी भुलभुलैय्याच ठरेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Sambhajinagar
Surat-Chennai Highway : भूसंपादन दराबाबतची बैठक फिस्कटली; शेतकऱ्यांचा मोर्चा

४ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन शिवसेना - भाजप आघाडी सरकारच्या काळात  राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रीपती संभाजीनगरात पार पडली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. मराठवाड्यातील दुष्काळाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध योजना राबवण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला होता.

तब्बल ४९ हजार २४८ कोटींच्या विविध कामांना त्यावेळी मंजुरी देण्यात आली होती. यात मराठवाड्यातील प्रामुख्याने शेती सिंचनाला चालना देण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी ४८०० कोटींच्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. त्यासोबतच लोअर दुधना प्रकल्प ८१९ कोटी, नांदूर - मधमेश्वर प्रकल्प - ८९४ कोटी, उर्ध्व पेणगंगा व कुंडलिका प्रकल्प १७३० कोटी, इतर सिंचन प्रकल्प १०४८ कोटी याप्रमाणे जवळपास ९३०० कोटी खर्चांच्या कामांचा मार्ग मोकळा झाल्याचा आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला होता.

प्रत्यक्षात त्याचा दुष्काळ ठरला. यातील सर्वच प्रकल्प कागदावर ठेवले. त्याचवेळी जलसंधारणाशी संबंधित सिंचन विहिरींसाठी १०९५ कोटी, शेततळी उभारण्यासाठी ३७५ कोटी, फळबागा संवर्धनासाठी ३७५ कोटी, आणि जलसंधारण आयुक्तालयासाठी ४० कोटी एकूण १८८५ कोटींची कामे करण्याचा त्यावेळच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.

त्याचवेळी २०० कोटीतून विमानतळ विस्तारीकरण, तीन हजार कोटीतून २३०० कि.मी. रस्त्यांची कामे २५०० कोटीचा वर्धा - नांदेड महामार्ग विकास, ४५३ कोटीचा म्हैसमाळ विकास आलाखडा, २३२ कोटीतून माहूर पर्यटन विकास आराखडा, मराठवाड्यातील गावागावात एक हजार डेअरी बोर्ड, २७ हजार कोटींचा राष्ट्रीय महामार्ग विकास, सिंचन प्रकल्पांना चालण्यासाठी १०४८ कोटींना मंजुरी या प्रकल्पाचे काय झाले, असा खोचक सवाल विरोधकांनी करताच तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील अर्धवट व अपूर्ण प्रकल्पांचा गोलमाल अहवाल सादर करण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. 

Sambhajinagar
Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी Good News! 'या' प्रकल्पाच्या जागेसाठी 108 कोटी जमा

आता तब्बल ७ वर्षानंतर पुन्हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने ४९  हजार ४३७ कोटी ९० लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगर मधील ३०० वर्षे जून्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.त्याचबरोबर जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगडीत विविध निर्णय घेण्यात आले. मात्र सात वर्षांपुर्वी फडणवीस सरकारचा मागचा अनुभव पाहता आश्वासनांचा पाऊस आणि नियोजनाचा दुष्काळ नको, अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.

असा आहे शिंदे सरकाचा आश्वासनांचा पाऊस

जलसंपदा – २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये

सार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख 

पशुसंवर्धन, दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय -

३ हजार ३१८ कोटी ५४ लाख, नियोजन – १ हजार ६०८ कोटी २८ लाख, परिवहन – १ हजार १२८ कोटी ६९ लाख, ग्रामविकास – १ हजार २९१ कोटी ४४ लाख, कृषी विभाग – ७०९ कोटी ४९ लाख, क्रीडा विभाग – ६९६ कोटी ३८ लाख, गृह – ६८४ कोटी ४५ लाख, वैद्यकीय शिक्षण – ४९८ कोटी ६ लाख, महिला व बाल विकास – ३८६ कोटी ८८ लाख, शालेय शिक्षण – ४९०  कोटी ७८ लाख

सार्वजनिक आरोग्य -

३५ .३७ कोटी, सामान्य प्रशासन- २८७ कोटी, नगरविकास – २८१ कोटी ७१ लाख, सांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाख, पर्यटन – ९५ कोटी २५ लाख, मदत पुनर्वसन – ८८ कोटी ७२ लाख, वन विभाग - ६५ कोटी ४२ लाख, महसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाख,उद्योग विभाग- ३८ कोटी, वस्त्रोद्योग -२५ कोटी, कौशल्य विकास-१० कोटी,  विधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख

जलसंपदा विभाग -

मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार. २२.९ अ.घ. फूट पाणी वळविण्याची १४ हजार ४० कोटींची योजना राबविणार. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार - १५० कोटी.

नियोजन विभाग - मराठवाड्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करणार 

वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा - १५६.६३ कोटी

श्री तुळजा भवानी मंदिराचा १३२८ कोटीचा विकास आराखडा 

श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास - ६०.३५ कोटी. उदगीर येथे बाबांच्या समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी - १ कोटी

सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री मुर्डेश्वर महादेव मंदीर देवस्थानाच्या ४५ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा - ९१.८०कोटी

मानव विकास कार्यक्रमात १०० बसेस पुरविणे - ३८ कोटी

महिला व बालविकास विभाग - मराठवाड्यातील ३४३९ अंगणवाड्यांच्या बांधकामांचा तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम. ३८६.८८कोटी

शालेय शिक्षण -

मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई स्व. दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वर येथे यथोचित स्मारक उभारणार. ५ कोटी 

मराठवाड्यातील स्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून विकसित करणार. ७६ तालुक्यांतून शाळा निवडणार. विविध सुविधांसाठी ९५ कोटी.

बीड जिल्ह्यांतील उस तोड कामगारांच्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. १६०० मुलीना लाभ - ८०.०५ कोटी

मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करणार. २० टक्के लोकसहभागाची अट शिथिल - २०० कोटी खर्च

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु करणार. ४०० मुलींना शिक्षण घेणे शक्य - २०.७३कोटी खर्च

क्रीडा विभाग -

परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जागा मंजूर - १५ कोटी 

छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत - ६५६.३८ कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारणार 

कलाग्रामच्या जागेवर एमआयडीसी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार. 

परळीत ५ कोटींचे तालुका क्रीडा संकुल उभारणार 

उदगीर तालुक्यात जळकोट येथे ५ कोटी खर्चून क्रीडा संकुल उभारणार 

परभणी जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी १५ कोटीस मंजुरी 

पशुसंवर्धन विभाग 

मराठवड्यात दुधाची क्रांती येणार. सर्व जिल्ह्यातील ८६०० गावांत दुधाळ जनावरांचे वाटप. ३२२५ कोटी 

तुळजापूर तालुक्यात शेळी समुह योजना राबविण्यासाठी १० कोटी

देवणी या गोवंशीय प्रजातीच्या उच्च दर्जाची वंशावळ निवड - ४कोटी

पर्यटन विभाग-

फर्दापूर, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. प्रत्येकी ५० कोटी 

उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथे पर्यटनस्थळ- ५कोटी

अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाचा विकास. 40 कोटी.

सांस्कृतिक कार्य विभाग-

मराठवाड्यातील विविध स्मारके,प्रसिद्ध मंदिरांचा विकास.अंबेजोगाई, संगमेश्वर, तर, महादेव मंदीर माणकेश्वर, तेर मंदीर, महालक्ष्मी मंदिर, होट्टल मंदिर, भोग नृसिंह, गुप्तेश्वर मंदिर धाराशूर, चारठाणा मंदीर समूह आदी - २५३ कोटी ७० लाख. 

Sambhajinagar
Nashik : MSRDC करणार बाह्य रिंगरोडचे काम; महापालिकेचे सर्वेक्षण थांबवले

महसूल विभाग-

बीड जिल्हाधिकारी इमारत उभारणार.६३.६८कोटी

वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा.

लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय शासकीय इमारत.

वन विभाग-

लातूर, वडवाव, नागनाथ टेकडी विकास करणार. ५.४२ कोटी 

माहूर येथे वनविश्रामगृह बांधणार.

मदत व पुनर्वसन-

वसमत मौजे कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ३३.०३कोटी

मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणार. प्रादेशिक आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे बळकटीकरण -५५.६९ कोटी खर्च.

धारुर तालुक्यातील सुकळी या गावचे पुनर्वसन. 

उद्योग विभाग -

आष्टीला कृषिपूरक क्षेत्रासाठी एमआयडीसी उभारणार - ३८ कोटी 

वसमत, चाकूर, वडवणी (पुसरा), मौजे सिरसाळा ता. परळी येथे एमआयडीसी स्थापन करणे.

उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर

कौशल्य विकास विभाग-

धाराशिव विश्वकर्मा रोजगार योजना राबविणार 

सार्वजनिक बांधकाम-

मराठवाड्यातील रस्ते सुधारणार ३००कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेणार. २४००कोटी

नाबार्ड अर्थसहायातून मराठवाड्यात ४४ कामे हाती घेणार. १०९कोटी

हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून मराठवाड्यातील १०३०कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणार. १० हजार ३००कोटी

साबरमती घाटाप्रमाणे नांदेडचा गोदावरीघाटाचे सौंदर्य खुलणार. रिव्हर फ्रंटसाठी १००कोटीखर्च

औसा तालुक्यातील मातोळा येथे तसेच कंधार तालुक्यातील मौजे कंल्हाळी येथे हुतात्म्यांचे स्मारक उभारणे. 

लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे बहुउद्देशीय इमारत उभारणार. 

पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस निधी. 

बीड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम.

लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चार पदरी करणे.

ग्रामविकास विभाग- 

मराठवाड्यातील ७५ ग्रामपंचायतींना आता स्वत:चे कार्यालय मिळणार आहे. पुढील ३ वर्षात १८० कोटी देणार.  स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत. 

बीड येथे जिल्हापरिषदेची नवीन इमारत. ३५ कोटी.

उर्जा विभाग 

परळी औष्णीक विद्युत केंद्र येथील प्लांट्सना मंजुरी.

गृह विभाग 

नांदेड शहरात सीसीटिव्हीचे जाळे.शहर सुरक्षित होणार. १००कोटी

१८निजामकालीन पोलीस स्टेशन्सचा होणार कायापालट. ९२.८०कोटी

बीड, परळी, अंबाजोगाई येथे पोलीस हौसिंग. 300 कोटी. 

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच मिल कॉर्नर येथील निवासस्थाने. १९१ कोटी ६५ लाख. 

परिवहन विभाग-

मराठवाड्यातील विविध शहरांतील बस स्थानकांमध्ये अमुलाग्र बदल करणार 

छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक ११९७ई-बसेस चालवणार . ४२१कोटीस मान्यता 

छत्रपती संभाजीनगर विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार. १३५.६१ कोटी 

राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार. पुणे- छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता. १८८.१९कोटी खर्च येणार 

छत्रपतीसंभाजीनगर व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथ प्रकल्प.१०.३७ कोटी 

वरील सर्व उपक्रमांना मिळून एकूण १ हजार १२८ कोटी  ६९ लाख निधी. 

Sambhajinagar
Thane : कंत्राटी बस वाहकांचा अर्धा पगार खाणारे बोके कोण?

नगरविकास विभाग-

मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर

केंद्र पुरस्कृत अमृत २.० - छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रुपये २७४०.७५ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प रुपये २७५.६८ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प तर रुपये २.७८ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असे एकूण रुपये ३०५९.२१ कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 

नांदेड वाघाळा महानगरपलिकेसाठी रुपये ३२९.१६ कोटी किमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प 

अर्धापूर नगरपंचायतेसाठी रुपये २५.१३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प 

भूम नगरपरिषदेसाठी रुपये १.८३ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प 

माहूर नगरपरिषदेसाठी रुपये २४.६२ कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प 

पेठ उमरी नगरपंचायतेसाठी रुपये ३.६० कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प 

हिंगोली शहरासाठी रुपये १०४.२८ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प 

औंढा नागनाथ तिर्थक्षेत्रासाठी रुपये ३६.४४ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प 

खुलताबाद शहरासाठी रुपये २१.३२ कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प 

नळदुर्ग शहरासाठी रुपये ९३.४२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प 

माजलगांव शहरासाठी रुपये ४६.५४ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प 

लोहा शहरासाठी रुपये ६६.३९ कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प 

तुळजापूर तिर्थक्षेत्रासाठी रुपये १५८.५२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प 

उमरगा शहरासाठी रुपये १२६.८२ कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प 

अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्प रुपये १६.५६ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. 

जालना शहर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये ३५ MLD क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र व १५ MLDक्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी रुपये ५६.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.रुपये ४७.९८ कोटी 

नांदेड वाघाळा महानगरपालिका घनकचरा प्रकल्प- रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

श्री. क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकास आराखडा- रुपये २८६.६८ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. 

औंढा नागनाथ विकास आराखडा रुपये ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये ६४०.२९ कोटी निधी . त्यापैकी रुपये ५३४.७४ कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये ५०५.५५ कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर 

परभणी शहराची रुपये १५७.११ कोटी किंमतीची समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल. 

परभणी शहराची रुपये ४०८.८३ कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येईल. 

लातूर रस्ते विकास प्रकल्प रुपये ४१.३६ कोटी मंजूर करण्यात येईल.

नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये २६.२१ कोटी व परभणी महानगरपालिकेस रुपये ११.७५ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.

उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये १२ कोटी निधी मंजूर करण्यात येईल.

उदगीर शहरात भूमीगत गटार यंत्रणा.

नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील कार्यान्वीत असलेल्या घनकचरा प्रकल्प व प्रगतीपथावर असलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी रुपये ८.०७ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

माहिती व तंत्रज्ञान संचालनालय-

मराठवाड्यात ४३२ ग्रामपंचायतीना भारतनेट जोडणी वर्षभरात देणार. २८६ कोटी.

छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय. 

रोजगार हमी योजना

मराठवाड्यात ४ लाख विहिरींचा कार्यक्रम राबविणार.

कृषी विभाग 

आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बीड येथे सीताफळ आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योग. ५ कोटी 

हळद संशोधनास आता वेग येणार. हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी १०० कोटी.

अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरु.१०५ कोटी.

सार्वजनिक आरोग्य विभाग

अहमदपूर, चाकूर, माजलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर, धारुर तालुक्यातील तेलगाव तसेच वडवली येथे ग्रामीण रुग्णालयास निधी, किनगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम.  एकूण निधी ३७४ कोटी ९१ लाख. 

मृद व जलसंधारण

अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर ९ कोल्हापुरी बंधारे.  पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरा साठवण तलाव, आष्टी आणि शिरुर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे.

अल्पसंख्याक विकास

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.

छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान २ लाखावरुन १० लाख करणे. 

इतरही घोषणा

परळी वैजनाथ विकास आराखड्यात आयुर्वेद पार्कचा समावेश, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com