Sambhajinagar : 'या' कोट्यवधींच्या उखडलेल्या रस्त्याची चौकशी करण्यासाठी अधिकारी हिंमत दाखवतील?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील कोहीनूर प्लाझा पुल ते पिसादेवी पर्यंत मोठा उहापोह करून सरकारच्या मोठ्या निधीमधून या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकाम करताना रस्त्याचे रूंदीकरण देखील करण्यात आले. अंदाजपत्रकात रस्त्याच्या मधोमध दुभाजक नसताना एका आमदाराच्या सांगण्यावरून दुभाजकाचा देखील समावेश करण्यात आला. मात्र अद्याप त्याला मंजुरी नाही, असे असताना दुभाजकासाठी ४०० एम. एम.ची पोकळी ठेवण्यात आली.‌रस्त्याचे उद्घाटन करताना आमदार तथा एका केंद्रीय मंत्र्यांनी मोठा गाजावाजा सुध्दा करण्यात आला. मात्र, काही महिन्यातच रस्त्याचे उजव्या बाजूला काम सुरू असताना डाव्या बाजूला अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याचे चित्र तमाम जनता बघत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : अनधिकृत बांधकामे करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

तीन वर्षांपूर्वी याच मार्गावर आर.सी.पुल बांधण्यात आला होता. त्या पुलावरील सिमेंट रस्ता देखील असाच उखडल्याची यानिमित्त गावागावात चर्चा सुरू झाली. आता नव्यानेच तयार झालेला रस्ता आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व खा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात त्यांच्याच कार्यकाळात बांधकाम सुरू असतानाच काही दिवसातच रस्ता अनेक ठिकाणी उखडला. रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली.या रस्त्याला सरकारने भरभरून निधी दिला आहे, मग हा रस्ता कसा उखडला.? हा रस्ता उखडण्यामागे कारणे काय आहेत?काही मोठी गडबड तर झाली नाही ना?, असे अनेक प्रश्न, चर्चा, तर्क - वितर्क नागरिकांना पडले आहेत.हा रस्ता एवढ्या लवकर कसा उखडला,या रस्त्यात नेमका घोळ कुणी व कसा केला आहे.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हिंमतीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुजान नागरिक करत आहेत. राजे शिवछत्रपतींनी बांधलेले गड किल्ले, मलिक अंबरने बांधलेल्या नहरी, बंध, विहिरी, तलाव, औरंगजेबने बांधलेली तटबंदी, दरवाजे ऐतिहासिक स्थळे , इंग्रजांनी बांधलेले पूल शेकडो वर्षानंतर देखील सुस्थितीत असताना आता आधुनिक तंत्रज्ञान आले असतानाही एकीकडे रस्त्याचे काम चालू असतानाच दुसरीकडे रस्ता उखडतो यामध्ये किती मोठा घोळ होत असेल, असा साहजिक प्रश्न जनतेला पडतो.विशेष म्हणजे हा रस्ता आधीच्या डांबरीरोडवरच बनविण्यात आला आहे.त्यामुळे त्याच्या खाली कोणतेही खडी,मुरुम अथवा भरती टाकुन दबाई केली गेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : पाटबंधारे विभागाचा अजब कारभार; पावसाळ्यात 'या' प्रकल्पाच्या दुरूस्तीला मुहूर्त?

असा आहे रस्त्याचा लेखाजोखा

- काम करणारी यंत्रणा : सार्वजनिक बांधकाम विभाग

- योजनेचे नाव : ५०५४ - अर्थसंकल्पीय योजना

- कामाचे नाव - छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर - पळशी - अंजनडोह रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग - १७ दरम्यान कोहीनुर प्लाझा ते पिसादेवी १.५ ते ४.५ किलोमीटर लांबीत रूंदीकरणासह डांबरीकरण करणे.

- सरकारी मान्यता: ५ डिसेंबर २०२२ नुसार ५ कोटी

- तांत्रिक मान्यता: ६ मार्च २०२३

- टेंडर रक्कम : ३ कोटी ४८ लाख २२ हजार

- टेंडर स्विकृत रक्कम : ५.५५ रुपये कमी दराने ३ कोटी ३७ लाख ८२ हजार

- कंत्राटदार कंपनी : मे राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर , छत्रपती संभाजीनगर

- कार्यारंभ आदेश: बी.१ / ११७५/२०२३-२४

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३

- दोष दायित्व कालावधी: १२० महिने

- कामाचे स्वरूप: पुलावरील २०० मीटर लांबीत बी.एम.कारपेट, सिलकोट करणे.

- १४०० मीटरमध्ये ५.५०मीटरने ७०० मी. रूंदीकरणासाठी २.००मी. रुंदी व ०.१५ मी. रूंदीत जीएसबी ७.३० मी रूंदी व ०.१० मी जाडीत जी.एस.बी. करणे व ७.३० मी.रुंदी व ०.१०मी.जाडीत डी.एल.सी.करणे. व एम. ३० ग्रेडचा अंतिम लेअर टाकणे. 

- याकामाचा अंदाजपत्रकात समावेश नाही: रस्त्याच्या मधोमध ०.४०० एम.एम.चा दुभाजक टाकणे. पण आमदार बागडेंनी दिलेल्या सुचनेनुसार तो टाकण्यासाठी संपुर्ण लांबीत पोकळी ठेवण्यात आली आहे. अद्याप त्याला विभागाची मान्यता नाही. हे काम केल्यास ५० लाखाचा खर्च वाढेल.

काय म्हणतात जबाबदार

रस्ता उखडलेला नाहीये. अवजड वाहतूकीमुळे सिमेंटचे पाणी (स्लरी) बाहेर पडलेली आहे. जर रस्ता उखडलेला असता, तर गिट्टी बाहेर पडली असती. खड्डे पडले असते. अद्याप रस्त्याचे काम चालु आहे. या रस्त्यावर वाहनांची खुप वर्दळ आहे. त्यामुळे रस्त्यावर लोड खूप येत आहे. दोष निवारण कालावधी १२ महिन्याचा असल्याने दुरूस्ती सुरूच राहणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या डिझाईन नुसार काम सुरू आहे.कामात गडबड नाही.

- इम्रान खान, प्रकल्प व्यवस्थापक 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com