Sambhajinagar : पाटबंधारे विभागाचा अजब कारभार; पावसाळ्यात 'या' प्रकल्पाच्या दुरूस्तीला मुहूर्त?

irrigation department
irrigation departmentTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दुष्काळी खुलताबाद तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेल्या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पाचा कालवा व‌ धरण दुरूस्ती व विशेष दुरुस्तीसाठी जीएसटी वगळून १ कोटी ७७ लाख ४३ हजाराचे टेंडर काढले. यात दिड लाख रुपये इसारा रक्कम ठरविण्यात आली, टेंडरची किंमत दोन हजार रुपये ठरविण्यात आली. काम करण्याचा कालावधी १२ महिने ठरविण्यात आला. मात्र आता अधिकारी टेंडर पुन्हा काॅल केल्याचे म्हणत आचारसंहिता असल्यामुळे प्रक्रिया थांबल्याचे सांगत आहेत. मुळात जलसंपदाच्या १८ ऑक्टोबर २०२३ च्या सरकारी निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ई-टेंडर सुचना क्रमांक-१० नुसार २०२३-२४ मध्येच दुसऱ्यांदा क्रमांकनुसार टेंडर सुचना प्रकाशित केली होती. आचारसंहितेपूर्वी टेंडरचा उपलब्ध कालावधी २९ फेब्रुवारी २०२४ ते ११ मार्च २०२३ निश्चित करण्यात आला होता.‌ जिओ टॅगिंगचा कालावधी २९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ निश्चित करण्यात आला होता.‌ टेंडर‌ उघडण्याचा कालावधी १३ मार्च २०२४ निश्चित करण्यात आला होता.‌ वेळीच टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असती आणि कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिला असता तर धरण दुरुस्तीचे काम मार्गी लागले असते. त्यामुळे धरणात येत्या पावसाळ्यात जलसाठा वाढला असता आणि गेली कित्येक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या खुलताबादसह तालुक्यातील २० गावांना दिलासा मिळाला असता.

irrigation department
Sambhajinagar : अनधिकृत बांधकामे करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा; विभागीय आयुक्तांचे आदेश

दुष्काळी खुलताबाद तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पांतर्गत धरणाचा कालवा व धरण दुरुस्तीसह विशेष दुरूस्तीसाठी राज्याच्या राज्यपालांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सक्षम टेंडरधारकाकडुन ब - १ नमुन्यातील ई - टेंडर प्रणालीद्वारे ऑनलाईन टेंडर मागविण्यात आले होते. टेंडरची कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले होते. सदर संकेतस्थळावर संबंधित कंत्राटदारांनी कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच विभागीय कार्यालयाच्या सुचना फलकावर देखील टेंडरची माहिती काही अटींवर लावण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया कागदावरच राहिली. आणि पुढे आचारसंहिताच्या कचाट्यात अडकली. धरणाच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच  ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात गिरीजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. धरणात ६६. ३६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता.‌ मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.खुलताबाद  तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या गिरिजा धरणावर खुलताबाद शहरासह १२ गावे पाणीपुरवठा योजना; तसेच फुलंब्री तालुक्यातील पाच गावांची येथील पाणीपुरवठा योजना आहे. पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील पाण्याचे शासकीय टँकर भरण्याची या प्रकल्पात असलेल्या बुडीत क्षेत्रातील विहिरीतून सुविधा आहे.

irrigation department
Mumbai News : कशी असेल मुंबईची नवी ओळख?

यापूर्वी गिरिजा धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे. गिरिजा धरणात समाधानकारत जलसाठा झाल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता.धरणात ३ ऑगस्ट २०२० रोजी उपयुक्त जलसाठा १४.०५ दशलक्ष घनमीटर (६६.३६ टक्के) आहे. प्रकल्पावर पिण्याच्या पाण्यासाठी नऊ बिगर सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.मात्र धरणातील गाळ काढणे, कालवा व धरण दुरूस्तीची आवश्यकता असताना त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे.  परिणामी पावसाळ्यात धरणाच्या बंधाऱ्याला गळती लागून पाणी वाया जाते.‌दुरूस्ती वेळीच केली तर पाण्याची नासाडी वाचेल. आता पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन पोहोचला आहे.आता पावसाळ्यात दुरूस्तीची कामे मार्गी लावणार‌ का , असा प्रश्न खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना व‌ नागरिकांना पडला आहे.

असा आहे धरणाचा गोषवारा

- सिंचन क्षेत्र : ३४४७ हेक्टर

- लागवडी योग्य क्षेत्र : ५३२८ हेक्टर,

- बुडीत क्षेत्र : ७२९ हेक्टर

- पाणलोट क्षेत्र : १८०.७४ चौरस किलोमीटर

- धरणाची लांबी : २८.५० मीटर

- धरणाची महत्तम उंची : १९.६ मीटर

- उजवा कालवा : १०.१५ किलोमीटर

- डावा कालवा : १७.५० किलोमीटर

- मृतसाठा : ३.२७ दशलक्ष घनमीटर

- प्रकल्प उपयुक्त साठा : १४.०५ दशलक्ष घनमीटर

- प्रकल्पीय क्षमता : २४.५० दशलक्ष घनमीटर

- साठा पातळी मीटर : ६६४.९० मीटर

- आठ वेळा प्रकल्प कोरडा

- गिरिजा मध्यम प्रकल्प १९८७मध्ये पूर्ण करण्यात आला असून, १९९०-९१मध्ये पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. १९९०-९१ ते २०१५-१६ या कालावधीत गिरिजा मध्यम प्रकल्प फक्त दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरलेला असून, चार वेळा ७५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला होता. उर्वरित वर्षे धरण ७५ टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने भरले असून, यामध्ये आठ वर्षे मृत साठ्यातही पाणी शिल्लक नसल्याने धरण कोरडेठाक पडले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com