Good News: संभाजीनगरातील 'हा' रस्ता आता होणार सुसाट; कारण...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील दुभाजकांच्या दशावतारावर 'टेंडरनामा'ने प्रहार केला. तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी वृत्ताची दखल घेतली. तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून २५ काॅंक्रिट रस्त्यांच्या मधोमध दुभाजकांचे दर्जेदार काम सुरू आहे.

Sambhajinagar
नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

महापालिकेकडून याकामासाठी लातुरच्या के. एच. कंन्सट्रक्शन कंपनीची निवड केली आहे. दरम्यान कामगार चौक ते महालक्ष्मी चौक रस्ता दुभाजकाचे देखील काम सुरू झाल्याने प्रबोधनकार ठाकरे नगरातील मायानगर, सी सेक्टर, विनय काॅलनी, लक्ष्मी काॅलनी, अंबिकानगर, संत तुकोबानगरी, राजीवगांधी नगर, लोकशाही काॅलनी, जुनी व नवीन एस.टी. काॅलनी, एन -३ व एन - ४ भागातील नागरिकांनी ठेकेदार खंडू पाटील, माजी नगरसेविका सत्यभामा शिंदे, माजी नगरसेवक दामोधर शिंदे, तसेच महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, शहर अभियंता आविनाश देशमुख, कार्यकारी अभियंता भागवतराव फड यांचे आभार मानले आहे.

दीड मीटर उंच दुभाजकाचे आयआरसीच्या नियमानुसारच बांधकाम होत असून, यात १२ व ८ एमएमचे लोखंडाचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे एम - ४० दर्जाचे काॅंक्रिट वापरले जात असल्याने मजबूत बांधकाम केले जात आहे. दुभाजकाच्या कामामुळे बेशिस्त वाहनांचा अडथळा दूर होणार असल्याने रस्ता आता सुसाट होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

कामगार चौक ते महालक्ष्मी चौक रस्त्याचे आठ वर्षापुर्वी सरकारी अनुदानातून काँक्रिटीकरण करण्यात आले होते. रस्त्यावर पथदिवे आणि हायमास्टही बसविण्यात आले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता प्रकाशमय झाला आहे. वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. आता रस्त्यावरील दुभाजकाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरवात झाली आहे.

यापूर्वी दुभाजक नसल्याने थेट रस्त्याच्या मधोमध वाहने वळवणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांचा अडथळा दूर झाल्याने या भागातील शेकडो वसाहतधारकांना अपघाताचा धोका दूर झाला आहे. दुभाजकाच्या बांधकामामुळे आता दिलासा मिळाला आहे.

Sambhajinagar
Nashik: देवळ्यातील गावांचा विरोध वाढला; वाळू ठेक्याचे टेंडर रद्द?

कामगार चौक ते महालक्ष्मी चौक रस्त्याचे महापालिकेकडून काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र दुभाजकासाठी निधी नसल्यामुळे दुभाजकाच्या कामाला ब्रेक देण्यात आला होता. ती कामे केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून सुरू करण्यात आली आहेत. जालना रस्त्याला जोडणाऱ्या हायकोर्ट ते मुकुंदवाडी चौकाला मिळणाऱ्या १२ मीटरचा हा भव्य गुळगुळीत रस्ता मुकुंदवाडी, गारखेडा भागातील अनेक रस्त्यांना जोडण्याचे काम करतो.

शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या जालनारोडच्या दुरुस्तीची कामे निघाल्यास सोहम मोटर्स ते कामगार चौक या रस्त्यावरून वाहने वळविण्यात येतात. त्याचबरोबर, मुकुंदवाडी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जात असल्याने, या ठिकाणी वाहनाची वर्दळ मोठी आहे. रस्ता गुळगुळीत असल्यामुळे वाहने देखील सुसाट धावतात. मात्र दुभाजक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे सावट पसरले होते.

विशेष म्हणजे याच मार्गावर जिल्हा क्रीकेट असोसिएशनचे भव्य क्रीडा संकुल असल्याने सकाळ - संध्याकाळ नागरिकांची या मार्गावर मोठी रेलचेल असते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट वसाहत असल्याने अपघात मुक्तीसाठी येथे दुभाजकाची मोठी आवश्यकता होती.

'टेंडरनामा' वृत्त मालिकेचे पाठबळ घेत या भागातील माजी नगरसेविका सत्यभामा शिंदे, माजी नगरसेवक दामोधर शिंदे यांच्याकडून दुभाजक बांधकामाची मागणी महापालिकेकडे वारंवार करण्यात आल्याने, महापालिकेने पंधराव्या वित्त आयोगातून होत असलेल्या दुभाजक बांधकामाच्या यादीत याही रस्त्याचा समावेश केला. अखेर ठेकेदार के. एच. कंन्सट्रक्शनमार्फत या दुभाजकाचे काम सुरू केले आहे. एक किलोमीटर लांब तर १२ मीटर रुंदीच्या रस्ता दुभाजकासाठी जवळपास ३० लाखापेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे.

Sambhajinagar
Pune: पुणेकरांसाठी चांगली बातमी; रिंगरोड, मेट्रोला 'बुस्टर डोस'

आता त्रासातून मुक्ती

यापूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजक जमीनदोस्त झाल्याने रस्त्याच्या मधोमध दुभाजकाच्या जागेत होणारी पार्किंग आणि रस्त्यांच्या मधोमध शाॅटकट वळण घेणाऱ्या बेशिस्त वाहतुकीतून या भागातील नागरिकांची सुटका होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलासमोर गौणखनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या मधोमध थांबवले जात असत.

शिवाय हे ट्रॅक्टरचालक रस्त्याच्या मधूनच वळसा घेत असल्याने येथे नेहमी अपघाताचा धोका होता. आता दुभाजकाचे बांधकाम होत असल्याने या धोक्यातून नागरिकांची सुटका झाली आहे. रस्त्यावर वाहने आडवी-तिडवी पार्क केली जात असत. त्यामुळे चारचाकी दुचाकी वाहने व कामगार बसेस चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असे.

लहान मुले रस्त्यावर वावरतात. त्यामुळेही लहान-मोठे अपघात होत असल्याने, बेशिस्त वाहनधारक आणि इतर वाहन चालकात नेहमी वाद होत असत. आता या वादातूनही सुटका होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com