अबब! 'मध्यान्ह भोजन योजना’ या महिन्यात पचविले 60 कोटींचे अन्न

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महाराष्ट्रात १८ लाख ७५ हजार ५१०  इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील ७६ हजार बांधकाम मजूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात सरकारने  महत्त्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजना’ सुरू केली असून, या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार दिला जात असल्याचा गवगवा केला जात आहे. मात्र 'टेंडरनामा' तपास मोहीमेत निकृष्ट अन्न दिले जात असल्याचे समोर आले आहे. याकडे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 'टेंडरनामा'ने या प्रकरणी सखोल चौकशी केली असता ११ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ ते १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान ५७४ दिवसात तब्बल ५९ कोटी ७१ लाख २८ हजार १२७ रूपयाचे अन्न बांधकाम मजुरांनी पचवल्याचे समोर आले आहे. याचा तपशिलासह पुरावा 'टेंडरनामा'कडे उपलब्ध आहे.

Sambhajinagar
Aditya Thackeray: 6 हजार कोटींचे भ्रष्ट 'मेगा रोड टेंडर' रद्द करा

छत्रपती संभाजीनगरातील बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत 'मध्यान्ह भोजन योजना' राबवली जाते. कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम सुरू करण्यासाठी सरकारच्या इमारत व बांधकाम कामगार मंडळ यासाठी एक टक्का उपकर दिला जातो. या उपकरातून बांधकाम कामगारांना २८ प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. २०११ पासून सुरू झालेल्या या मंडळाकडे आतापर्यंत ११ हजार कोटी रुपयांचा निधी शिल्लक असून या निधीच्या माध्यमातून बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

Sambhajinagar
Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील 'तो' अवघड अडथळा दूर

महाराष्ट्र सरकार व मंडळाने बांधकाम कामगारांना होणाऱ्या जेवणाची अडचण विचारात घेऊन बांधकाम कामगारांना कामाच्याठिकाणी “मध्यान्ह भोजन योजना’ जाहीर केली असून राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुरु केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत बांधकामाच्या ठिकाणावरील नोंदीत व अनोंदीत बांधकामकामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगारांची रात्रीच्या जेवणाची निकड विचारात घेऊन सद्यस्थित मध्यान्ह भोजन व रात्रीचे जेवण बांधकाम कामगारांना देण्यात येते. आहे. या योजनेमध्ये कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येतो. या आहारात मेनू १ मध्ये मेनू २ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण जेवणात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर आहार समाविष्ट केला आहे.

Sambhajinagar
Mumbai : 'BKC'तील 3 हजार कोटींच्या भूखंडांसाठी टेंडर

या योजनेकरिता मंडळाने गुनानी कमर्शियल प्रा. लि. मुंबई या कंपनीस काम दिलेले आहे. सदर कंपनीने (एमआयडीसी शेंद्रा) या ठिकणी भोजन तयार करण्याची व्यवस्था केलेली आहे. तयार झालेले जेवण पॅकबंद डब्यातून वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्व कामाच्या ठिकाणी पुरविले जात आहे. जिल्ह्यातील सर्व बांधकामाच्या साईटवर नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना आणि नाका बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सदरचे मध्यान्ह भोजन सद्यस्थितीत मोफत दिले जात आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नोंदीत व पात्र लाभार्थी बांधकामकामगारांना मागील११ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ ते १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान ५७४ दिवसात तब्बल ५९ कोटी ७१ लाख २८ हजार १२७ रूपयाचे अन्न बांधकाम मजुरांनी पचवल्याचे 'टेंडरनामा' तपासात समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com