सिंधुदुर्गातील रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती; प्रमुख मार्गांचे सेफ्टी ऑडिट

चाकरमान्यांच्या वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; कणकवली फ्लायओव्हरवरील खड्ड्यांचीही तातडीने दुरुस्ती
Road
RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी रस्त्यांची नियमित देखभाल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Road
Speed Breaker vs Rumble Strips: रम्बल स्ट्रिप्स आणि स्पीड ब्रेकरमध्ये फरक काय? जाणून घ्या नियम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची सद्यस्थिती, देखभाल-दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या कामांचा आढावा मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खड्डे बुजविण्यासह रस्त्यांची मजबुतीकरणाची कामे करा

खराब झालेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे राणे यांनी सांगितले. केवळ खड्डे बुजविण्यापुरती कार्यवाही न करता रस्त्यांचा दर्जा आणि टिकाऊपणाकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गातील रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे चाकरमान्यांना तसेच स्थानिक नागरिकांना प्रवासात अडथळे येऊ नयेत, यासाठी दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

Road
खड्डे बुजवण्यात दिरंगाई नको; पालिका आयुक्तांना 24×7 यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. अशा ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता सुरक्षा साधने आणि अन्य आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे राणे यांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामांची नियमित पाहणी करून त्यांचा दर्जा तपासावा. संबंधित विभागांनी आपल्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती सातत्याने तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.

कणकवली फ्लायओव्हरची तातडीने दुरुस्ती

कणकवली फ्लायओव्हरवरील रस्त्यावर खड्डे पडल्याने काही ठिकाणी पाणी साचत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

Road
मुंबईकरांसाठी Good News! लोकलचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट

Key Points

  • गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश,

  • राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा आढावा,

  • खड्डे बुजविण्यासोबत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यावर भर,

  • प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना,

  • अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश,

  • कणकवली फ्लायओव्हरवरील खड्डे आणि पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाय करण्याचे आदेश,

  • चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी नियमित पाहणी,

  • रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि टिकाऊपणा तपासण्याच्या सूचना.

Tendernama
www.tendernama.com