‘तो’ 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग कोकणसाठी ठरणार गेमचेंजर?

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन केली. वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर मार्गासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी यावेळी दिले.

Railway
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी‘च्या चौथ्या टप्प्याचे सिव्हिल वर्क 100 टक्के; फेब्रुवारीत होणार खुला

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटी दरम्यान नारायण राणे यांनी मागण्यांबाबतचे निवेदनही सादर केले. रेल्वेमंत्र्याचे लक्ष वेधताना २०१६ रोजी घोषणा झालेला प्रस्तावित वैभववाडी- -कोल्हापूर (आचीर्णे जंक्शन) रेल्वे मार्ग निर्मीतीला चालना देण्याची मागणी केली. निवेदनात राणे म्हणतात, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६ मध्ये केली होती. तेव्हापासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद केली, परंतु रेल्वे बोर्डाने त्यास मान्यता दिलेली नाही यामुळे हा प्रकल्प मागे पडत आहे.

Railway
Devendra Fadnavis : महाराष्ट्र पहिला होता, पहिला आहे अन् पहिलाच राहील! असे का म्हणाले फडणवीस?

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची लांबी १०७ किमी आहे. कोल्हापूर-वैभववाडी सेक्शनचे बांधकाम केवळ कोकण रेल्वेसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल. हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात बंदरे आणि बंदरांचा विकास करेल आणि सीमावर्ती भागातून किनाऱ्यापर्यंत मालाची वाहतूक सोपी होईल. राज्य विकासाची नवी भरारी घेईल.म्हणून आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना संबंधितांना करावी, अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केली आहे.

Railway
Navi Mumbai : 'यामुळे' नवी मुंबई मेट्रो सेवा ठरली राज्यातील एकमेव सरस

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात तातडीने सेवा देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मत मांडले आहे. सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्ग स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग स्टेशनवर पीआरएस सुविधा उपलब्ध करून द्या. या स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि एक स्टेशन एक उत्पादन योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्या. या स्थानकावर प्रवाशांसाठी एलईडी इंडिकेटर आणि बारमाही सावलीयुक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com