नागपूर मनपाचा तुघलकी आदेश; वर्दळीचा संपूर्ण रस्ताच 3 महिने बंद

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील रामदासपेठेतील सर्वाधिक वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडाच्या काँक्रिटीकरणासाठी ठेकेदाराने हा संपूर्ण रस्ता तीन महिन्यासाठी बंद केला आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. रस्त्याचे दोन पदर असताना एकाचवेळी काम करण्याची ठेकेदाराला का घाई झाली हे कोणालाच समजेनासे झाले आहे.

Nagpur
पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

सेंट्रल बाजार रोडच्या काँक्रिटीकरणाचे निम्मे काम झाले आहे. मात्र वर्षभरापासून फक्त पाचशे मीटर रस्त्याचे काम बाकी ठेवण्यात आले होते. आता जेथून काँक्रिटकरणाचे काम केले जाणार आहे त्या रस्त्याच्या दुतर्फ हॉटेल, शाळा, हॉस्पिटलसह मोठमोठी प्रतिष्ठाने आहेत. काही लोकांची घरेही आहेत. त्यांना आपल्या दुकानात किंवा घरी जाण्यासाठी ठेकेदाराने काही जागाच शिल्लक ठेवलेली नाही. आधी एक पदर पूर्ण करणे अपेक्षित होते. तसे केले असते तर सर्वांच्या सोयीचे झाले असते. महापालिका प्रशासनाने सुद्धा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ठेकेदाराला सेंट्रल बाजार रोडवीरल दोन्ही पदरी रस्ता बंद करण्याची परवानगी दिली आहे. या मार्गावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचाराला येणारे रुग्ण, रुग्णवाहिका यांना याचा सर्वाधिक मनस्ताप होणार आहे.

Nagpur
मोठी बातमी! पुण्यातून 'या' मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस?

कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंतच्या अर्धवट राहीलेल्या सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे कल्पना बिल्डिंग ते जनता चौकपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने सोमवार, ९ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. ८ मार्चपर्यंत अर्थात तीन महिने हा रस्ता बंद राहील. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हा रस्ता बंद राहणार असल्याचा आदेश काढला आहे.

Nagpur
'या' कारणांमुळे शिंदे-फडणवीस आता 'ताकही फुंकून पिणार'

रस्त्याच्या कामानिमित्त दोन्ही बाजूने सूचना फलक लावणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा रहिवासी नागरिकांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी मनपा अधिकारी व कंत्राटदाराला केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com