पुण्यातून सुटणाऱ्या 16 रेल्वेगाड्यांचा प्रवास 'का' बनला धोकादायक?

Railway Station
Railway StationTendernama

पुणे (Pune) : भारतीय रेल्वेचा प्रवास जरी बुलेट ट्रेनच्या दिशेने सुरू असला तरीही अजूनही पुण्यासह देशातील अन्य महत्त्वाच्या स्थानकावरून कालबाह्य ठरलेल्या ‘आयसीएफ’ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) डब्यांतून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे. अपघात झाल्यास ‘आयसीएफ’ डब्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता काही रेल्वेला ‘एलएचबी’ डबे जोडले आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. पुणे स्थानकावरून प्रवास सुरू करणाऱ्या २७ रेल्वे आहेत. पैकी ११ रेल्वेला ‘एलएचबी’ (लिंक हॉफमॅन बुश) डबे जोडण्यात आले तर १६ रेल्वेला अजूनही जुने ‘आयसीएफ’ डबे जोडलेले आहेत. या १६ रेल्वेमधून रोज किमान २४ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ‘आयसीएफ’ डब्यांची निर्मितीमध्ये ६० वर्ष जुन्या तंत्रज्ञानाचा वापर झाला.

Railway Station
शिंदे गटाच्या दादा भुसेंनी फिरविला शब्द; ४६१ पैकी १० गावांनाच...

बांद्रा टर्मिनस ते जोधपूर दरम्यान धावणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचा सोमवारी पहाटे अपघात झाला. यात १० डबे रुळावरून उतरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रवासी जखमी झाले आहे. या रेल्वेला देखील ‘आयसीएफ’चे डबे जोडलेले होते. या डब्याचे वजन सुमारे २५ टन आहे. शिवाय याला सीबीसी (सेन्टर बफर कपलिंग) नसल्याने डबे एकमेकांवर आदळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. त्यामुळे हे डबे खूप धोकादायक ठरते. हे लक्षात घेत व प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत सर्व रेल्वेचे डबे एलएचबी होणे गरजेचे आहे.

Railway Station
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

‘एलएचबी’च्या तुलनेत या डब्याचे वजन जास्त आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर परिणाम होतोच. डबे एकमेकांना जोडण्यासाठी स्क्रू कपलिंगचा वापर केला जातो. त्यामुळे अपघात झाल्यावर डबे एकमेकांवर फेकले जातात. शिवाय ते दूरवर फेकले जातात. अपघातानंतर डब्यांत निर्माण होणारा दबावाला बाहेर पडण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. यामुळे जीवितहानीचे प्रमाण जास्त आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे डबे लाकडाचे होते. १९५५ मध्ये लाकडी डब्याचे रूपांतर लोखंडी डब्यात करण्याचे ठरले. त्यानुसार स्विझर्लंड येथून डब्याचे शेल (प्रोटोटाइप) आणण्यात आले. १९६२ मध्ये चेन्नई जवळच्या ‘आयसीएफ’ रेल्वे कोच फॅक्टरीत त्या प्रोटोटाइपनुसार डब्याचे उत्पादन झाले. त्यालाच ‘आयसीएफ’ डबे म्हणून ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाने या डब्याचे उत्पादन बंद केले. मात्र अजूनही त्याचा वापर सुरूच आहे.

Railway Station
नार-पार-गिरणा नदी जोडला 2 महिन्यात मान्यता; 58000 हेक्टरला लाभ

रेल्वे बोर्डाच्या आदेशा नुसार ‘आयसीएफ’ डब्याचे उत्पादन बंद केले. आता ‘एलएचबी’ डब्याचे उत्पादन सुरू आहे. बोर्ड जेवढे उद्दिष्ट देते त्यानुसार आम्ही डब्यांचे उत्पादन करतो.
- जी. व्यंकटेशन, जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार रेकमध्ये बदल केला जातो. आतापर्यंत ११ रेल्वेला एलएचबीचा रेक जोडण्यात आला आहे. जसे रेक उपलब्ध होतात त्यानुसार हा बदल केला जाईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com