नागपूर विधानभवनासह शहरात निकृष्ट दर्जाचे मॅनहोल;ठेकेदारांवर प्रश्न

Manhole
ManholeTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : विधानभवन तसेच संपूर्ण शहरात निकृष्ट दर्जाचे मॅनहोल लावण्यात आले आहे. ते रस्त्याच्या समतल नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. आयएसआय मार्क नसताना स्थानिक व्यवासायिकांचेच मॅनहोल लावण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Manhole
नागपूर 'APMC'त अग्निशमन यंत्रणेसाठी ७ कोटी; मंत्री दादा भुसे

जनमंच या सामाजिक संस्थेच्यावतीने चौकशी या मॅनहोलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महापालिकेतील अभियंते व त्यांच्या नातेवाईकांनी मॅनहोल व आयब्लॉकचे कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ठेकेदारांना काम देतानाच संबंधिताकडून खरेदी अलिखित अट टाकली जाते. हे मॅनहोल वर्षभरही तग धरत नाही. एखादी मोठी वरून गेल्यास तडकते. विधानभवनाताही निकृष्ट दर्जाचे हॅनहोल लावण्यात आले आहेत. मंत्री व आमदारांच्या वैद्यकीय सुविधेसाठी विधानभवन परिसरात तैनात असलेल्या रुग्‍णवाहिकेचा अपघात यामुळेच झाला. ही रुग्णवाहिका मॅनहोलचे कव्हर तुटल्यामुळे त्यात रुतली होती. धक्का मारून तिला बाहेर काढावे लागले.  यानंतर तातडीने सिमेंटचचे दुसरे कव्हर झाकून ठेवण्यात आली. या कव्हरची उंची रस्त्यापेक्षा आठ ते दहा इंच जास्त आहे. त्यामुळे आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Manhole
'पायोनियर'चा आर्थिक बोजा राज्यातील ग्राहकांवर?2000 कोटींचा घोटाळा

संपूर्ण शहरात अशाच चुकीच्या पद्धतीने मॅनहोल कव्हर लावण्यात आले आहे. सिमेंटच्या मॅनहोल कव्हर्स व फ्रेमसाठी आयएसआयचे निकष असताना ते का लावल्या जात नाही. या मागे कोणाचे हिसंबंध आहेत. मॅनहोल कव्हरचे लोड टेस्टिंग केले जात नाही. तसेच रस्त्याच्या लेव्हलाला ते नसतात. त्यामुळे ते वारंवार तुटतात. मोठ्या गाड्यांचा अपघात होतो.
संपूर्ण शहरासाठी मॅनहोलच्या फ्रेम व कव्हरचे सारखेसुद्धा नाहीत. आयएसआय मार्क असलेलेच मॅनहोल कव्हर्स व फ्रेम वापरणे बंधनकारक का केले जात नाही, असे प्रश्न जनमंचने उपस्थित केले आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com