प्रतिक्षा संपली; उद्या निघणार अधिवेशनाचे ९५ कोटींचे टेंडर

Nagpur Vidhan Bhavan
Nagpur Vidhan BhavanTendernama

नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी ९५ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) काढण्याच्या प्रक्रियेला गती आली असून, उद्या (ता. ५) सर्व कामांची टेंडर उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे ठेकेदारांसह सर्वच अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

Nagpur Vidhan Bhavan
एक-दोन गुंठ्यांच्या नोंदणीबाबत मोठी बातमी; विखे-पाटीलांची माहिती

दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याने सर्वच उत्सुक आहेत. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकाच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशन होऊ शकले नाही. आघाडीच्या दुसऱ्या वर्षांच्या काळात कोरोनो ओसरला होता. तेव्हा अधिवेशन होण्याची शक्यता वर्तविला जात होती. मुंबईतील झालेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुढील अधिवेशन नागपूरला होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विदर्भात मोठी नाराजी व्यक्त होत होती.

Nagpur Vidhan Bhavan
वाढीव निधी पाठवूनही मेडिकलचा रोबोट थांबलेलाच!

सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच हिवाळी अधिवेशन कुठल्याही परिस्थितीत नागपूरलाच होईल, असे ठामपणे सांगितले होते. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर नागपूरला येऊन गेले. त्यांनी पाहणी केली आणि बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खर्चाचा आढावा घेतला. ९५ कोटी रुपये अपेक्षित खर्च काढला. त्यानुसार टेंडर बोलाविले आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com