Dr. Pulkunwar Nashik
Dr. Pulkunwar NashikTendernama

नाशिक महापालिकेत 706 पदांची भरती; डिसेंबरमध्ये प्रक्रिया

नाशिक (Nashik) : वैद्यकीय व अग्निशमन दलातील रिक्तपदे भरण्यासंदर्भात राज्य सरकारची अधिसूचना नाशिक महापालिकेला प्राप्त झाली आहे. यामुळे पंधरा दिवसांत दोन्ही विभागातील मिळून 706 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाशिक महापालिकेत डिसेंबरमध्ये मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Dr. Pulkunwar Nashik
एसटीच्या डेपोंचा 'बीओटी'वर विकास; लवकरच जागतिक टेंडर निघणार

कोविड 19 महामारीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली खर्च ३५ टक्क्यांच्या वर गेला असल्याने तेथे नोकरभरतीसाठी अडचणी येत असतानाच सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटीमुळे रिक्तपदे येत भरता नव्हती. नाशिक महापालिकेने १४००० पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला. मात्र, तो मंजूर करण्यासही सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटी कारणीभूत ठरत आहेत. मात्र, आवश्यक सेवेसाठी मनुष्यबळ गरजेचे असल्याने राज्य सरकारने आरोग्य व अग्निशमन दलातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही विभागातील सेवाशर्ती नियमातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने शासनाला प्रस्ताव सादर केला. दरम्यान राज्य सरकारनेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील पदे भरण्यास मान्यता दिली. तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांच्या माध्यमातून करण्याच्या स्पष्ट सूचना आहे.

Dr. Pulkunwar Nashik
नाशिक झेडपीतील २८ लाखांची लिफ्ट उभारणीआधीच वादात

त्या संदर्भातील अधिसूचनादेखील राज्य शासनाने काढली आहे. त्याची प्रत महापालिकेला बुधवारी (ता. २३) प्राप्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतदेखील अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागातील ३४८, तर आरोग्य व वैद्यकीय विभागातील अशा ७०६ पदांसाठी मंजूर सेवा प्रवेश नियमावलीनुसार पदांची भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस ( टीसीएस) व इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ( आयबीपीएस) या दोन संस्थापैकी एका संस्थेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सेवाप्रवेश नियमावलीनुसार अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ आता महापालिकेत रिक्त असलेल्या २०१५ च्या भरतीसाठीदेखील प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com