फडणवीसांच्या घोषणेने 'त्या' शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नाशिक (Nashik) : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी (Pune - Nashik Highspeed Railway Track) नाशिक व सिन्नर (Nashik - Sinnar) तालुक्यात 26 हेक्टर जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या आहेत. मात्र, त्यानंतर रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले असून, नाशिक - पुणे रेल्वे कम रोड (Nashik - Pune Railway Cum Road Project) असा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनीचे काय होणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. (Fadnavis' announcement increased the confusion of 'these' farmers!)

Devendra Fadnavis
सध्या तरी गुंठेवारीतील बांधकामांची दस्त नोंदणी नाही; कारण...

नाशिक आणि पुणे ही दोन महत्त्वाची महानगरे थेट रेल्वे मार्गाद्वारे जोडण्याची जुनी मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे - नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळाली. संयुक्त मोजणी, जमिनींचे मूल्यांकन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या रेल्वे मार्गासाठी सिन्नर तालुक्यात १७ पैकी १३ गावांमध्ये तर नाशिक तालुक्यात जमिनी संपादित केल्या आहेत, पाचपैकी तीन गावांमध्ये डिमार्केशन केले गेले. 

Devendra Fadnavis
भुमरे, सत्तारांना 'या' महत्त्वाच्या अभियानाचा पत्ताच नाही?

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी नाशिक जिल्ह्यात २६३.१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण प्रस्तावित केले होते. त्यापैकी आतापर्यंत २६.८७ हेक्टर जमिनीची खरेदी खते झाली आहेत. हे प्रमाण केवळ ११.१६ टक्के आहे. भूसंपादन विभागाने 26.87 हेक्टर जमिनीपोटी शेतकऱ्यांना जवळपास 35 कोटी रुपये रक्कम दिली आहे. काही शेतकऱ्यांनी ही रक्कम मिळाल्यानंतर दुसरीकडे जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यानंतर सरकारने हा प्रकल्प रद्द करून नवीन रेल्वे प्रकल्प करण्याची घोषणा केली आहे. यामुळे या जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis
सिंहस्थ आराखड्यात स्मार्ट सिटीची कामे; नाशिक पालिकेकडून पुन्हा...

सरकार पैसे परत घेणार का, जमिनी परत करणार का, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. याबाबत संबंधित शेतकरी भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून विचारत आहेत. मात्र, अधिकारी कानावर हात ठेवत असून या जमिनी रेल्वेने खरेदी केल्या आहेत व सरकारकडून आम्हाला याबाबत काहीही सूचना नसल्याचे उत्तर देत आहेत. यामुळे शेतकरी आणखी संभ्रमित झाले आहेत.

Devendra Fadnavis
विदर्भातील 'या' आदिवासी बहूल जिल्ह्यात धावणार नियो मेट्रो

असा होता रेल्वे मार्ग

सिन्नर तालुका : नांदूरशिंगोटे, मानोरी, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, शिवाजीनगर, दातली, गोंदे, मुसळगाव, कुंदेवाडी, कसबे सिन्नर, बारागाव पिंपरी, पाट पिंपरी, देशवंडी, वडझिरे, मोहदरी, चिंचोली, वडगाव पिंगळा

नाशिक तालुका : नाणेगाव, संसरी, बेलतगव्हाण, विहितगाव, देवळाली

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com