नाशिक शहरात साडेतीनशे कोटींच्या नवीन जलवाहिन्या

Mumbai
MumbaiTendernama

नाशिक (Nashik) : शहरातील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन नगरांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे जाळे पसरवण्यासाठी महापालिकेने साडेतीनशे कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. या सुधारीत प्रस्तावानुसार शहराच्या गावठाण भागात १०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून निधी मिळणार असून त्यासाठी राज्य सरकारने हा प्रस्ताव छाननीसाठी महारष्ट्र जीवन प्राधिकरणकडे दिला आहे.

Mumbai
शिंदे सरकारचा 'महाविकास'ला दणका; आमदारांची मूलभूत सुविधांची कामेच

नाशिक शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्यातून जवळपास ४० टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच शहराच्या विस्तारित भागात जलवाहिन्या टाकल्यानंतर आधीच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शहराचा विस्तार व वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजनांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने २०१८ मध्ये एक योजनेतून जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलणे, नवीन नगरामध्ये जलवाहिन्यांचे जाळे पसरवणे, नवीन जलकुंभ तयार करणे, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे यासाठी २२६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवल्यानंतर त्यांनीही महारष्ट्र जीवन प्राधिकरणकडून त्याला तांत्रिक मान्यता मिळवून केंद्राला पाठवला. मात्र, तोपर्यंत केंद्र सरकारच्या अमृत एक योजनची मुदत संपली होती. त्यामुळे अमृत दोन योजनेसाठी सुधारित प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते. होते. त्यानुसार महापालिकेने सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव तयार करताना भविष्यात नाशिक शहराचा होणारा विस्तार व लोकसंख्या विचारा घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांच सुधरित पाणी पुरवठा आराखडा तयार करून तो राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य सरकारने तो प्रस्ताव छाननीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठवला आहे.

Mumbai
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

सुधारित प्रस्तावातील तरतुदी
गावठाण भागात १०० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकणार शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून २२ किलोमीटर लांबीच्या पाचशे ते बाराशे मिलिमीटर व्यासाची जुनी पाइपलाइन बदलून त्याऐवजी लोखंडी पाइप लाईन टाकली जाणार आहे. नव्याने विकसित झालेल्या नगरांमध्ये ८५ किलोमीटर लांबीच्या नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com