नाशिक जिल्हा बँकेला पाच वर्षांत 'नासाका'कडून मिळणार २४ कोटी रुपये

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक, इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी महत्वाच्या असणारा नाशिक सहकारी साखर कारखाना मे. दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना भाडेतत्वावर चालवण्यास दिल्यानंतर नऊ वर्षांनंतर यावर्षी प्रथमच सुरू होणार आहे. या साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन सोहळा शनिवारी दुपारी होणार आहे. या कारखान्याचे जवळपास सव्वाशे कोटी रुपये कर्ज थकित झाल्याने नाशिक जिल्हा बँकेने हा कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याचे कर्ज बुडीत खात्यात वर्ग झाल्याने एनपीए वाढलेल्या जिल्हा बँकेला या गळीत हंगामामुळे एनपीए कमी होण्यास काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारखाना सुरळीत चालल्यास भाडेपट्टा व प्रतिटन गाळपापोटी जिल्हा बँकेला पाच वर्षांत २४ कोटी रुपये मिळू शकणार आहे.

Nashik
कॅबिनेट निर्णयाआधीच काढले टेंडर; दिवाळी किट खरेदी वादात?

नाशिक तालुक्यातील पळसे शिवारत नाशिक सहकारी साखर कारखाना असून नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व सिन्नर तालका हे त्याचे कार्यक्षेत्र आहे. अंतर्गत राजकारण व गैरव्यवस्थापनामुळे कारखाना बंद पड्ल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज थकले. यामुळे जिल्हा बँकेने कारखाना जप्त केला. हा कारखाना मागील नऊ वर्षांपासून बंद होता. कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासक मंडळाची नियुक्ती करावी, यासाठी ऊस उत्पादकांच्या प्रतिनिधींनी बराच पाठपुरावा केला होता. अखेर खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून हा कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्याचा निर्णय झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मे. दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांनी हा कारखाना चालवण्यास घेतला असून यापूर्वी त्याचे चाचणी गाळपही झाले आहे. यामुळे या हंगामात हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याचे नियोजन नवीन व्यवस्थापनाने केले आहे. कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता १२५० मेट्रिक टन असून हंगामामध्ये ३.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते साध्य करण्यासाठी कारखाना मशीनरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तसेच आवश्यक तो अग्रीम रक्कम वाटप करण्यात आली आहे.

Nashik
शिंदे-फडणवीसांच्या 'या' निर्णयाने ठेकेदार, आधिकारी का झाले खुश?

असा आहे भाडेपट्टा
नाशिक कारखाना चालवण्यास घेताना जिल्हा बँक व मे. दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स यांच्यात झालेल्या करारानुसार पहिली दोन वर्षे प्रत्येक ६२ लाख रुपये भाडे मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी एक कोटी अकरा लाख रुपये भाडे मिळणार असून चौथ्या व पाचव्या वर्षांमध्ये २ कोटी ११ लाख रुपये दरवर्षी भाडे मिळणार आहे. या शिवाय कारखान्याच्या संपूर्ण गळीत हंगामात गाळप होणाऱ्या प्रत्येक टन उसामागे नाशिक जिला बँकेला १०० रुपये रक्कम मिळणार आहे. कारखान्याने यावर्षी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण केल्यास पहिल्याच वर्षी जिल्हा बँकेला चार कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com