ठेकेदारांनो, नाशिकमध्ये रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुदत

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : शहरात वेगवेगळ्या कारणांनी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. यापूर्वी मे पर्यंत रस्ते खोदण्यास परवानगी असल्याने मे मध्ये खोदलेले रस्ते पुन्हा जुन-जुलैमध्ये खराब होतात. यामुळे यापुढे शहरात एप्रिलपर्यंतच रस्ते खोदता येणार आहेत, असा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार घेतला आहे.

Nashik
शिंदे सरकारची १ लाख कोटींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी

दरवर्षी शहरात खड्डे खोदण्यासाठी मे अखेरपर्यंत मुदत होती. जेणेकरून प्रकारच्या पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे बंद पाइपलाइन राहतील. परंतु, मे महिन्यात खोदून ठेवण्यात आलेले रस्ते पुन्हा बुजविले बांधकाम न गेल्याने पावसाचे पाणी साचून आदींसाठी तेच रस्ते पुन्हा शुल्क आता त्यातून अपघात होण्याचे प्रकार वाढले असले तरी त्याचा फायदा आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तर होत नाही. त्याशिवाय नागरिकांना कंपनी व भारत दूरसंचार निगम मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लिमिटेड कंपनीकडून खोदण्यात दिल्या आहेत.

Nashik
मुंबई-अहमदाबाद मार्गावर मिनी बुलेट ट्रेनचा थरार; वाचा सविस्तर...

महापालिकेकडून दरवर्षी नवीन रस्ते तयार केले जातात. हे रस्ते तयार झाल्यानंतर विविध केबल्स, ड्रेनेज, पिण्याची पाईप लाईन आदी कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केले जाते. या खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वर्षीच्या सलग पावसामुळं महापालिकेच्या बांधकाम विभागाला रस्ते खड्डे बुजवता न आल्याने नागरिकांची ओरड प्रचंड वाढली. यामुळे महापालिकेची प्रतिमादेखील मलिन झाली. याप्रकारे पुन्हा खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिका आयुक्तांकडून वेगवेगळ्या उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत. यात प्रामुख्याने ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, त्रयस्थ संस्थेकडून गुणवत्ता तपासणी करणे आदी उपाय जाहीर केल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आता रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच परवानगी दिली आहे. रस्ते खोदण्यास परवानगी दिल्यानंतर संबंधित कंपनीने 30 एप्रिलला काम बंद करून पावसाळ्यानंतरच सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

Nashik
238 नव्या एसी लोकल येण्याआधी होणार सर्वेक्षण; सल्लागारासाठी टेंडर

रस्ते दुरुस्ती तपासणार

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड व भारत संचार निगमकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. गॅस कंपनीने तर जवळपास २०५ किलोमीटरचे खोदकाम केले आहे. खोदाईपोटी महापालिकेकडे तोडफोड शुल्कदेखील जमा करण्यात आले. मात्र, शुल्क जमा केले म्हणजे संबंधितांची जबाबदारी संपुष्टात आली असा एक अर्थ काढला जात आहे. मात्र, रस्त्याची खोदाई करून त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम झालेली जागा पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. यामुळे आता खोदकाम करण्यात आलेली जागा पूर्ववत केली की नाही, याची तपासणी बांधकाम विभागाकडून करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com