नाशिकमध्ये पुरवठादार - मनपा का आले आमने-सामने?

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीमध्ये निर्माण होणाऱ्या डेब्रिजचे संकलन होऊन त्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळे नाशिक शहरातील स्वच्छतेला मोठा अडसर निर्माण होत आहे. यामुळे या डेब्रिजपासून पेव्हरब्लॉक तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. मात्र, हा प्रकल्प झाल्यास पेव्हरब्लॉक पुरवठादारांचे दहा ते बारा कोटींचे नुकसान होणोर असल्याने प्रकल्प कागदावर येण्याआधीच त्याला विरोध करत मोडता घालण्यास सुरवात केली आहे. यासाठी प्रकल्पाच्या संभाव्य जागेला विरोध करून ठराव विखंडित करण्यासारखे हातखंडे वापरले जात आहे. यामुळे पेव्हरब्लॉक प्रकल्पापवरून पुरवठादार, महापालिका समोरासमोर आल्याचे चित्र आहे.

Nashik Municipal Corporation
रेल्वेकडून खुशखबर! 'या' बदलांमुळे पुणे-सोलापूर प्रवास होणार सुसाट

नाशिक शहरातील जुन्या इमारती, वाडे यांची पुनउर्भारणी करताना मलबा व टाकाऊ बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. या साहित्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या महापालिकेसमोर आहे. या डेब्रिजची विल्हेवाट लावण्याचा कोणताही मार्ग महापालिकेकडे नसल्यामुळे स्वच्छता स्पर्धेत नाशिक शहराचा क्रमांक घसरला आहे. यामुळे महापालिकेने या टाकाऊ साहित्यापासून पेव्हरब्लॉक तयार करण्याचा स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाथर्डी येथील या जागेवर पेव्हर प्रकल्प उभरण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, त्या जागेचे भूसंपादन न झाल्याने नगर नियोजन विभागाने मखमलाबाद शिवारातील पेठरोड लगतची पर्यायी जागा सूचवली आहे.

Nashik Municipal Corporation
सीएम सोडविणार का पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे भूसंपादनाचा तिढा?

महापालिका पेव्हर ब्लॉकची सर्वात मोठी खरेदीदार असून, महापालिकेला दरवर्षी दहा ते बारा कोटींचे पेव्हरब्लॉक लागत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, जॉगिंग ट्रॅक, फूटपाथ, उद्याने एवढेच काय पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठीदेखील पेव्हर ब्लॉक उपयोगात आणले जातात. त्यामुळे बांधकाम साहित्याच्या मलब्यातून पेव्हर ब्लॉक तयार करून उपलब्ध साहित्याच्या नैसर्गिकरित्या विल्हेवाट लावण्याबरोबरच महापालिकेला उत्पन्नाचे एक चांगले साधन उपलब्ध होईल, या उद्देशाने खत प्रकल्पाच्या धर्तीवर पेव्हर ब्लॉक प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते.

Nashik Municipal Corporation
शिंदे-फडणवीस जोडी येऊनही 'समृद्धी'चे लोकार्पण लांबणीवर?

महापालिकेने स्वत:चा प्रकल्प टाकल्यास आपला व्यवसाय अडचणीत येणार याचा अंदाज आल्याने या पुरवठादारांनी महापालिकेचा हा प्रकल्प उभा राहण्यासाठी जागाच उपलब्ध होऊ नये, असे हातखंडे वापरणे सुरू केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण मखमलाबाद येथील प्रस्तावित जागेला विरोध करण्यासाठी केवळ चार ते पाच लोकांनी आंदोलन केले. त्यावरून महापालिका प्रशासनाने तो ठराव विखंडित करावा यासाठी शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तत्पूर्वीचा पाथर्डी येथे बांधकाम साहित्य संकलित करून त्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारला जाणारा पेव्हर ब्लॉक प्रकल्पही राजकीय दबाव आणून गुंडाळण्यात प्रशासनाला भाग पाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com